Home | Gossip | Yami Gautam and Pankaj Tripathi expressed the joy of receiving the National Award

यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याचा आनंद 

दिव्य मराठी वेब, | Update - Aug 12, 2019, 01:35 PM IST

अपेक्षेपेक्षा जास्त चित्रपटाला प्रेम मिळाले - यामी

 • Yami Gautam and Pankaj Tripathi expressed the joy of receiving the National Award

  एंटरटेन्मेंट डेस्क : नुकतेच ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली, त्यात यामी गौतम अभिनीत चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'ला चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पंकज त्रिपाठीचा 'हरजीता'ला उत्कृष्ट पंजाबी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यामी आणि पंकजने आपला आनंद व्यक्त केला.

  अपेक्षेपेक्षा जास्त चित्रपटाला प्रेम मिळाले - यामी...
  यामी म्हणते, २०१९ वर्ष माझ्यासाठी खूपच चांगले राहिले. चित्रपट उरीने खऱ्या अर्थाने सर्व विक्रम मोडले. आम्ही जेव्हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल, असे वाटले हाेते. रिलीज नंतर ज्याप्रकारे प्रेम मिळाले, त्याची तर अपेक्षा केली नव्हती. हा चित्रपट जागाेजगाी दाखवण्यात आला. मी विकी कौशल, आदित्य धर आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देते.

  माझ्या पहिल्या पंजाबी चित्रपटाला मिळाला नॅशनल अवॉर्ड - पंकज...
  दुसरीकडे पंकज म्हणतात, मला आताच बातमी कळाली की, माझ्या 'हरजीता', पंजाबी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहेे. यात मी महत्त्वाची भूमिका केली होती. ही बातमी ऐकून मी खुश आहे. सीनियर डीओपी विजय अरोडाला आम्ही प्रेमाने दद्दू बोलतो. त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेच मला या चित्रपटासाठी पंजाबला घेऊन गेले होते.

Trending