आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामी गौतमने चंडीगडमध्ये घेतले घर, 2016 मध्ये खरेदी केले होते 100 वर्षे जुने हेरीटेज होम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री यामी गौतमने चंदीगडमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. मीडिया रिपोर्टनुसार यामीला आपल्या कुटुंबामुळे याच शहरात घर हवे होते. हिमाचल प्रदेशात जन्मलेली यामी चंदीगडमध्ये वाढली. गेल्या वर्षी ती सेंद्रिय शेती करण्यासाठी तिच्या फार्म हाऊसवर गेली होती.

डुप्लेक्समध्ये बनवली वाचनासाठी खास जागा 

अहमदाबाद मिररच्या वृत्तानुसार, यामीच्या जवळच्या स्त्रोतांनी सांगितले की, तिने अलीकडेच चंदीगडमध्ये डुप्लेक्स विकत घेतले आहे. हे शहरातील तिचे पहिले घर आहे. आठवडाभरात यामी तिच्या कुटुंबासोबत नवीन घरी शिफ्ट होईल. या अभिनेत्रीने यापूर्वी 2016 मध्ये 25 एकरांवर बांधलेले 100 वर्षे जुने हेरिटेज होम खरेदी केले होते.


सध्या यामीच्या घराचे इंटेरियरचे काम सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीने स्वत: साठी यापूर्वीच येथे वाचनासाठी जागा निवडली आहे. 'विक्की डोनर' ने बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी यामी 'गिन्नी वेड्स सनी' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिच्यासोबत चित्रपटात विक्रांत मैसी दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत खन्ना करत आहेत आणि विनोद बच्चन निर्माते आहेत.

फिल्मफेअरमध्ये नामांकन न मिळाल्याने व्यक्त केली होती नाराजी

फिल्मफेअर अवॉर्ड्स 2020 मध्ये नामांकन न मिळाल्याने यामीने तीव्र नाराजी व्यक्त केली होते. तिने इन्स्टावरील एका ओपन लेटरमध्ये लिहिले की, 'बाला'मधील माझ्या अभिनयाकडे दुर्लक्ष करून नामांकन न मिळाल्याने असंख्य संदेशांना उत्तर म्हणून मी माझे मत मांडावे असे मला वाटते. खरं सांगायचं तर, एखादा पुरस्कार कर्तृत्व आणि आत्मविश्वास मजबूत बनवितो. परंतु नामांकन ही आपली कठोर मेहनत आणि टॅलेंटविषयी असलेल्या प्रेम आणि सन्मानाची ओळख आहे. ज्युरी म्हणून सिनेसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या लोकांचा समावेश असतो आणि मी त्यांचा आदर करते आणि त्यांचा दृष्टिकोन स्वीकारते.

शेवटी, मला एवढेच सांगायचे आहे की, केवळ अनुभवच आपल्याला आत्मविश्वास आणि जीवनात दृढ बनवितो. प्रत्यक्षात, आपल्याला आपल्या कामासाठी किंवा स्वत: साठी कोणत्याही प्रमाणीकरणाची आवश्यकता नाही. यावर्षी मला चित्रपटसृष्टी, समीक्षक, माध्यम, प्रतिभावान सहकारी आणि विशेषतः माझे प्रेक्षक यांचेकडून मिळालेले प्रेम पुरेसे आहे. हे अधिक चांगले काम सुरू ठेवण्यासाठी मला प्रेरणा देते. आपण कोठून आलात, आपण कोण आहात... हे महत्त्वाचे नाही,  फक्त हार मानू नका आणि पुढे जात राहा.