आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Birthday Yami : जेव्हा कुटुंब एकत्र असते तेव्हाच वाढदिवस साजरा करते यामी, एकेकाळी होते सलमानच्या मेहुण्यासोबत अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'विक्की डोनर', 'बदलापुर' आणि 'काबिल'मध्ये झळकलेली यामी गौतम यावर्षी 'बत्ती गुल मीटर चालू'मध्ये दिसली होती.  आज (28 नोव्हेंबर) यामीचा 30वा वाढदिवस आहे. ती नेहमीच कुटुंबासाेबत आपला वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करते. मात्र, सध्या ती व्यग्र आहे. विशेष म्हणजे यामी तिच्या चित्रपटांपेक्षा पुलकित सम्राटसोबतच्या अफेअरमुळे जास्त चर्चेत होती. पुलकित हा सलमान खानची मानलेली बहीण श्वेताचा पुर्वाश्रमीचा पती आहे. यामीसोबत अफेअर सुरु झाल्यानंतर पुलकितने श्वेतापासून घटस्फोट घेतला होता. आता पुलकित आणि यामी यांचेही मार्ग वेगळे झाल्याची चर्चा बी टाऊनमध्ये आहे. 

 

वाढदिवसाच्या निमित्ताने यामीसोबत तिच्या कुटुंब आणि आगामी प्रोजेक्ट्सविषयी झालेली बातचीत... 

 

सध्या खूपच कमी चित्रपट करत आहेस, निवडक करत आहेस का ? 
- निवडक चित्रपट करत नाही. खरं तर, माझी काही चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. मी आज जे काम केले ते स्वत:च्या हिमतीवर केले आहे. इंडस्ट्रीत जेव्हा आपले कुणी नसते तेव्हा सर्व काही आव्हानात्मक होते. ज्या कामावर विश्वास होता तेच काम मी केले. प्रत्येक चित्रपट साइन करण्यामागे काही ना काही कारण होते. मला जे योग्य वाटले तेच मी केले. प्रत्येक वेळेस वेगळी स्क्रिप्ट, वेगळी भूमिका मला करायला आवडते. मी जेव्हा व्हर्सेटाइल म्हणते तर कामही तसेच करायला हवे, असे मला वाटते. दरवर्षी चित्रपट करावा, असा काही नियम नाही. मला जे आवडते तेच मी करणार आणि चांगले काम मिळण्यासाठी वाट पाहावी लागते. 

 

यंदा तुझा वाढदिवस कुठे आणि कसा साजरा करणार आहेस? 

- खरं तर, उत्सव तेव्हाच होतो तेव्हा कुटुंब सोबत असते. मी माझा वाढदिवस माझ्या कुटुुंबासाेबतच साजरा करत असते. मात्र, सध्या आई मुंबईत नाही. वडीलदेखील दुसऱ्या शहरात गेले आहेत. बहीण सुरीली लंडनमध्ये आहे. आम्ही जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच वाढदिवस साजरा करणार आहोत. आता कधी एकत्र येऊ ते माहीत नाही. नवीन वर्षात एकत्र येऊ तेव्हाच साजरा करू. 


पुढे वाचा, यामीला सर्वप्रथम कोण शुभेच्छा देते आणि यासह बरंच काही... 

 

बातम्या आणखी आहेत...