आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनाच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू, महामार्ग ओलांडताना अपघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येणेगूर - उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजीनगर तांडा येथे सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी मुलीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी(दि.१५) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. महामार्गावरून दुसऱ्या दिशेला जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने अपघात होत आहेत.

दाळींब ग्रामपंचायतीअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर तांड्यातील दाळींब येथिल ज्ञानदीप विद्यालयात सहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या पायल बाळू राठोड (वय १३) ही शाळकरी मुलगी रस्ता ओलांडताना उमरग्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची येणेगूर पोलिस दूरक्षेत्र माहिती मिळाल्यावरून पोहेकॉ निवृत्ती बोळके, दिगंबर सूर्यवंशी, खलिल शेख यांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला व रात्री आठच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. शनिवारी(दि.१६) सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पायलचे कुटुंब मोलमजुरी करुन उदरनिर्वाह चालवत होते. या घटनेने शिवाजीनगर तांड्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.उपाययोजना नाहीत, म्हणून अपघात 


शिवाजीनगर तांडा हा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने वसलेला असून, रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघात होत असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळीच पर्यायी व्यवस्था न केल्यास भविष्यातही रस्ता ओलांडताना अशा प्रकारचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...