आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोवर्धन बिर्लांना व्यवसायापेक्षा पेज ३ पार्टी, फिटनेसमध्येच आहे रस; युको बॅँकेने विलफुल डिफॉल्टर घोषित केल्याने आले चर्चेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्म- २९ सप्टेंबर १९६७
शिक्षण- कायदा विषयात पदवीधर, वाणिज्य विषयात पदवीधर (नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटी)
पत्नी- अवंती बिर्ला
 

यशोवर्धन बिर्ला (यश) १९९० मध्ये अमेरिकेत शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचे वडील अशोकवर्धन बिर्ला, आई सुनंदा आणि बहीण सुजाता यांचा बंगळुरूत विमान अपघातात मृत्यू झाला होता. आई-वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर यश अनेक दिवस त्यांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी भारतासह विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली. ते त्या काळात रोज मंदिरात जात. धार्मिक पुस्तके वाचत. यश यांना या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची पत्नी अवंतीही धार्मिक पुस्तके वाचत होत्या. यश यांनी मुलाखतीत सांगितले होते की, आता कुटुंबीय नाहीत हे सत्य मी दीर्घकाळपर्यंत स्वीकारू शकलो नव्हतो. त्यांना आजही आपल्या आई-वडिलांची हजेरी प्रत्येक ठिकाणी जाणवते.

यश यांना धर्म आणि अध्यात्मातही रस आहे. आजीमुळे त्यांचा कल त्याकडे आहे. लहानपणी त्यांची आजी त्यांना हिंदू धर्म-दर्शनाच्या पुस्तकातून कथा ऐकवत असत. आजही यश उपनिषदांचा अभ्यास करतात. देश-जगातील अनेक धर्मगुरूंच्या संपर्कात राहतात.हृषीकेश, मानसरोवरसहित अनेक धार्मिक स्थळांच्या यात्रा करतात.


 ५२ वर्षीय यश बॉडी बिल्डिंगचे शौकीन आहेत. आपल्या घरातील खासगी जिममध्ये सकाळी घाम गाळण्यासोबतच नियमितपणे ध्यान आणि प्राणायामही  करतात. अनेक वर्षांपासून सिक्स पॅक्स अॅब मेंटेन करत असलेले यश कोणतीही प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट घेत नाहीत. ते शाकाहारी आहेत. प्रोटीनसाठीही शाकाहारी पदार्थच घेतात. यश यांना पेज ३ पार्ट्यांची आवड आहे. मात्र, आपण फक्त पार्टीत जातो, आजपर्यंत ड्रग्ज किंवा दारू घेतली नाही, असा त्यांचा दावा आहे.


यश बिर्ला ग्रुपच्या काही कंपन्या दीर्घकाळापासून तोट्यात चालत आहेत. यश यांच्या जवळच्या लोकांच्या मते त्यासाठी त्यांचे काही चुकीचे निर्णय जबाबदार आहेत. यश यांनी जिमिंगदरम्यान झालेल्या एका मित्राला कंपनीत ‘ग्रुप प्रेसिडेंट-कॉर्पोरेट अफेअर्स’ बनवले होते. त्यानंतर खूप वादही झाला होता. यश म्हणतात की, ‘व्यवसाय माझ्या रक्तात आहे.  मी जेव्हा लहान होतो तेव्हा वडील अकाउंटिंग शिकवण्यासाठी सेंच्युरी मिलच्या ऑफिसला घेऊन जात असत.’ पण वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा त्यांनी व्यवसाय सांभाळला तेव्हा ते खूप लहान होते आणि मानसिकदृष्ट्या तयार नव्हते. तेव्हा त्यांना व्यवसायात सल्ला देणारे लोकही बाहेरचे होते. 


यश मान्य करतात की, त्यांना व्यवसायात कधी रुची नव्हती. त्यांना कधीच व्यवसाय करायचा नव्हता. त्यामुळे व्यवसाय व्यवस्थापन करू शकत नाहीत. अर्थात कंपनीची प्रतिमी बनवण्यासाठी त्यांनी जाहिरात संस्थांची सेवाही घेतली, पण त्यांच्या ग्रुपच्या कंपन्या काही विशेष करू शकल्या नाहीत. एकेकाळी यश यांनी विजय मल्ल्या आणि रिचर्ड ब्रेन्सन यांना आपला आदर्श मानले होते.