आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yash Chopra Birth Anniversary Rare Facts And Photos Of King Of Romance Yash Chopra

आता उरल्या फक्त आठवणी... इंजिनिअरींग सोडून चित्रपटांकडे वळले होते यश चोप्रा, डेंग्यूमुळे गमावले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचे किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांची आज 86वी जयंती आहे. 'सिलसिला', 'दिलवाले दुल्हनिया लें जायेंगे' यांसारख्या अनेक अविस्मरणीय रोमँटिक सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. यश चोप्रा दारु आणि सिगारेटसारख्या व्यसनांपासून लांब होते. मात्र ते खवैय्ये होते. पण त्यांच्याबाबत आणखी एक खास बाब म्हणजे, ते इंजिनिअर होणार होते. पण कदाचित त्यांच्या नशिबात चित्रपट लिहिलेले होते. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया त्यांच्या प्रवासावर...


इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जाणार होते लंडनला...
यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी लाहोरमध्ये झाला होता. येथेच त्यांचे शिक्षण झाले. 1945 मध्ये त्यांचे कुटुंब पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले होते. यश चोप्रा यांनी इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहिलेले होते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ते लंडनलासुद्धा जाणार होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. अचानक त्यांनी सिनेसृष्टीत करिअर करण्याचे ठरवले आणि हे स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईत दाखल झाले होते.

 

1959 मध्ये पहिला सिनेमा केला दिग्दर्शित...
यश चोप्रा यांनी सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती. थोरले बंधू बी. आर चोप्रा आणि आय.एस. जोहर यांना ते असिस्ट करत होते. 1959 मध्ये 'धूल का फुल' या सिनेमाचे त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. त्यानंतर अनेक हिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आणि 1973 मध्ये यशराज फिल्म्स या स्वतःच्या प्रॉडक्शन हाउसची त्यांनी स्थापना केली.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, यश चोप्रा यांच्या जीवनातील काही रंजक बाबी आणि पाहा त्यांचे Rare Pics

 

बातम्या आणखी आहेत...