आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी शाहरुखला पसंत करत नव्हते किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा, नाईलाजाने द्यावा लागला होता 'डर'मध्ये रोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः यश चोप्रा आणि शाहरुख खान या जोडीने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. जर यश चोप्रा नसते, तर कदाचित शाहरुख आज एवढा मोठा स्टार होऊ शकला नव्हता. पण एक काळ असा होता, जेव्हा यश चोप्रा आणि त्यांचा थोरला मुलगा आदित्य चोप्रा शाहरुखला पसंत करत नव्हते. डर चित्रपटासाठी जेव्हा यश चोप्रांनी शाहरुखला साइन केले होते, तेव्हा शाहरुख त्यांना फारसा आवडत नव्हता. त्यांनी शाहरुखचे 'किंग अंकल' या चित्रपटातील काही सीन्स पाहिले होते, जे त्यांना पसंत पडले नव्हते. पण शाहरुखला डर या चित्रपटासाठी साइन करणे यश चोप्रांसाठी नाईलाज होता. कारण एकही मोठा कलाकार डरमधील निगेटिव्ह भूमिका करण्यासाठी तयार नव्हता. जेव्हा यश चोप्रांनी डरमधील शाहरुखचा अभिनय बघितला, तेव्हा ते त्याच्यावर खूप इम्प्रेस झाले. 


यश चोप्रांना बॉलिवूड चित्रपटांचा रोमान्स किंग असे म्हटले जाते. शाहरुखने त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांच्या यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये बनलेल्या  'दिल तो पागल है', 'दिलवाले दुल्‍हनिया ले जाएंगे', 'मोहब्‍बतें', 'वीर जारा', 'रब ने बना दी जोडी' आणि 'जब तक है जान' या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 27 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेल्या यश चोप्रांना चार वेळा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळआला. 21 ऑक्टोबर 2012 रोडी डेंग्यूमुळे त्यांचे निधन झाले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्यांनी या जगाला अलविदा केले होते. 

बातम्या आणखी आहेत...