आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीस गर्भवती केले, एका पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल - तालुक्यातील वाघझीरा येथील २५ वर्षीय आदिवासी युवतीस युवतीच्या लग्नापूर्वी व लग्नांनतर प्रेमाचे व लग्नाचे आमीष दाखवून सुमारे अडीच वर्ष तीच्यावर अत्याचार करीत तीच्याशी लग्न न केल्याने युवतीची फसवणूक केल्यरप्रकरणी तालुक्यातील वाघझीरा येथील मुळ रहीवाशी तथा नंदुरबार पोलीस मुख्यालय पोलीस कॉस्टेंबल म्हणून नोकरीस असलेल्या इरफान अकबर तडवी या पोलिसांविरुद्ध येथील पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

तालुक्यातील वाघझीरा येथील २५ वर्षीय युवतीने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, वाघझीरा आश्रम शाळेत इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतांना गावातीलच इरफान अकबर तडवी व मी वर्गमीत्र आहोत. त्यानंतरच्या काळात किनगाव येथे डी. एड करीत असतांना त्याने माझ्याकडून माझा मोबाईल नंबर घेवून त्याने प्रेमाचे व लग्नाचे आमीष दाखववत. त्यास मी बळी पडले.

एप्रील २०१७ मध्ये पिडीत ही पोलीस भरतीसाठी नंदूरबार येथे गेली असता त्यांवेळी इरफान तडवी हा गावापासुन तिच्या सोबत बसमध्ये होता व नंदुरबार बसस्थानकावर उतरल्यानंतर त्याने प्रेमाचे आमीष दाखवत गौरव पॅलेस या लॉजवर नेले व अत्याचार केला. त्यानंतर १ जुन रोजी जळगाव येथे पिडीत तरूणीची डी. एड ची परीक्षा असतांना १० दिवस त्याने वारंवार जळगाव येथील स्टेशनरोडवरील देव हॉटेल येथे तसेच जानेवारी १९ पर्यंत यावल तालुक्यातील मोर धरण परीसर, आडगाव व हिंगोणा परिसरात वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. 


दरम्यानच्या काळात ती गर्भवती राहिली व पिडीताचे इतर दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरून विवाह झाला मात्र, ती गर्भवती असल्याने विवाहानंतर लगेच माहेरी आली व नतर सासरी न जाता नंदुरबारला इरफान तडवी कडे गेली तेव्हा त्याने पिडीतास जळगाव येथील एका रुग्णालयात नेवुन गर्भपात करवून घेतला. 

एकुणचं २०१६ ते जानेवारी २०१९ या दरम्यान त्यांने पिडीतावर लग्नाचे आमिष व बदनामीची भिती दाखवुन अत्याचार करून व लग्न न करता तिची फसवणूक केल्याचे तरूणीने फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या फिर्यादीवरून यावल पाेलिसात अत्याचारासह फसवणू सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहेत.

केलेले लग्न मोड, मग लग्न करू

सदरील पिडीत तरूणीला तिचे झालेले लग्न मोडायला लावले व तिला पुन्हा विश्वासात घेतले आणी तिचा गर्भपात केला आणी तरी देखील लग्न केले नाही. असे असतांना स्वत:हा करीता लग्ना साठी मुलगी शोधत असल्याचे पिडिताच्या लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याची खत्री झाली व गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...