आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्ये बंद समर्थक आणि बंद विरोधांमध्ये राडा, दुकानदाराने आंदोलकांच्या अंगावर फेकली मिरची पूड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुकानदाराने मिरची पूड फेकल्यावर संतप्त आंदोलकांनी दुकानावर दगडफेक केली
  • पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना पळवून लावले

यवतमाळ - यवतमाळमध्ये बुधवारी भारत बंद दरम्यान बंद समर्थन आणि दुकानदारामध्ये वाद झाला. दुकान बंद करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावर दुकानदाराने मिरचीची पूड फेकली. यामुळे संतप्त झालेल्या प्रदर्शकर्त्यांनी दुकानावर दगडफेक केली. यानंतर व्यापारी आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना तेथून पळवून लावले. 



दुकाने बंद करण्यास नकार दिल्यानंतर दुकानदार आणि आंदोलकांत वाद

बुधवारी नागरिकत्व दुरूस्ती कायदा (सीएए) एनआरसी आणि एनपीआर विरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या दरम्यान आंदोलकांनी शहरातील मुख्य बाजारपेठ गाठली. तेथे काही दुकानं सुरू होती. सुरू असलेली दुकाने पाहून आंदोलकांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास सुरवात केली. दुकानदारांनी दुकाने बंद करण्यास नकार दिल्यानंतर आंदोलक आणि व्यापारांमध्ये वाद झाला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला. 



घटनेला प्राप्त झाले होते जातीय वळण 


आंदोलकांमध्ये बहुतांश लोक विशिष्ट समाजातील होते. हाणामारीनंतर या घटनेला जातीय वळण प्राप्त झाले होते. परिसरातील तणाव लक्षात घेता येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...