यावल-भुसावळ रस्त्यावर दुचाकीच्या टायरचा स्फोट; एकाचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

प्रतिनिधी

Apr 22,2019 12:20:00 PM IST

यावल - यावल ते भुसावळ रस्त्यावर दुचाकीच्या समोरील टायरचा अचानक स्फोट झाला. यानंतर गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या विचित्र अपघातात एका व्यक्कतीचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. यातील मृताचे नाव शेख अजीम शेख सैफुद्दीन (25) असे होते. तर इतर दोन्ही जखमींना तात्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.


भुसावळ नाक्याच्या पुणे महाराष्ट्र धाब्याच्या समोर दुचाकी क्रमांक एम.एच. 19ए.सी. 7131 द्वारे शेख आजीम शेख सैफुद्दीन वय (अडावद तालुका चोपडा) हा जात होता. तत्पूर्वी भुसावळ नाक्याजवळ त्याच्या दुचाकीला हात देऊन निमगाव येथे जाण्याकरिता शेख कलीम शेख बशीर वय 30 व रईस गुलाम रसूल वय 30 हे दोघे राहणार दुचाकीवर बसले होते. हे तिघे एकाच बाइकवर घरी दजात असताना अचानक समोरील टायर फुटले. अपघाताची माहिती मिळताच घटनेची माहिती मिळताचं अपघाता ठिकाणी कदीर खान, हाफीज खान सुभान खान, शेख आलीम, शेख अजहर, रहिम शेख, सईद शाह, शेख करीम, जफर मोमीन, फारूख मुन्शी, शेख नईम आणि हवालदार गोरख पाटील आदींनी धाव घेत मदत केली. तसेच तात्काळ त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. रुग्णालयात डॉ. स्वाती कवडीवाले, आरती कोल्हे, नेपाली भोळे, प्रविण बारी आदींनी उपचार केले. यानंतर दोन्ही जखमींना तात्काळ पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मृतक शेख अजीमच्या पश्चात आई-वडील दोन लहान भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

X
COMMENT