आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यावल- व्हीप झुगारल्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलेल्या यावलमधील नगरसेविका रेखा युवराज चौधरी यांना नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिलासा देत त्यांचे पद कायम ठेवले आहे. 6 फेब्रुवारीला त्यांनी जिल्हाधिकाऱ्याचा निर्णय रद्द केला.
15 जानेवारी 2018 रोजी यावल पालिकेत विषय समिती सभापती निवडीवेळी महर्षी व्यास शविआचे गटनेते राकेश कोलते यांनी त्यांच्या गटातील नगरसेविका रेखा चौधरी यांना व्हीप काढून बालकल्याण समिती सभापती पदासाठी रुख्माबाई भालेराव यांना सूचक म्हणून स्वाक्षरी दिली होती. यानंतर देखील त्या सत्ताधारी गटाच्या सांगण्यावरून काँग्रेसच्या सईदाबी शेख हारून यांना अनुमोदक झाल्या. मात्र, त्यांचे हे अनुमोदन सभेत फेटाळण्यात आले आणि विरोधी गटाच्या सभापती झाल्या. दरम्यान, व्हीप झुगारल्या प्रकरणी चौधरींना 10 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या निर्णयाविरुद्ध चौधरींनी नगरविकास मंत्रालयात अपील दाखल केले होते. मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी चौधरींनी विरोधात कुणालाही मतदान केले नाही. म्हणून व्हीप झुगारला असे म्हणता येत नाही, या मुद्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय रद्द ठरवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.