आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्याशी प्रेम कर, नाही म्हणाली तर गोळी घालेन..प्रेम आणि युद्धात सर्व चालतं, असं म्हणत तरुणीवर रोखला गावठी कट्टा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- अल्पवयीन मुलीशी प्रेम व प्रेम संबंध तोडले तर तुला गोळी घालेन, असे म्हणत डोक्यावर पिस्तूल रोखणारा प्रेमवीर..या प्रकाराने अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न.. बुधवारी झाला या प्रकरणाचा उलगडा.. मुलीने नातेवाईकांनी यावल पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तपासाची चक्रे ‍फिरवून शहरातील बोरावल गेट गावठी कट्‍ट्यांसह चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरात गावठी कट्टा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी यावल पोलिस स्टेशनमध्ये अट्रावल येथील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदविली. अट्रावल येथे एका तरूणाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. एका आरोपीने अल्पवयीन मुलीवर पिस्तूल रोखून 'तू माझ्याशी प्रेम कर, नाही म्हणाली तर गोळी घालेन..प्रेम आणि युद्धात सर्व चालतं, असे सांगत धमकी दिली होती. पीडितेचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिस निरिक्षक डी.के.परदेशी, पोलिस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, डीबीचे हवालदार असलम खान, संजय देवरे, सुशील घुगे, राजेश वाडे, विजय जावरे, पंकज फिरके या पथकाने अट्रावल गाठले. गिरीश अनिल लोहार या तरूणाकडे चौकशी केली असता त्याने गावातील राजेंद्र बाबुराव लोहार, अशोक गोवर्धन तायडे यांची नावे सांगितली.  तिघांना ताब्यात घेत गावठी कट्ट्याबाबत चौकशी केली. पिस्तूल यावल शहरातील बोरावल गेट भागात राहणाऱ्या युवराज राजु भास्कर याच्याकडे असल्याची माहिती दिली. पोलिस पथकाने तिघांना घेत यावलला सांयकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बोरावल गेट येथे संबंधिताच्या घर गाठले. युवराज भास्करकडून गावठी कट्टा जप्त करून त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली:. चौघांविरूद्ध यावल पोलिसात आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...