Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Yawal Jalgaon farmer commits suicide due to debts

Suicide: कर्ज, नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या; शिवारातच सापडला मृतदेह

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 02:50 PM IST

नातेवाइकाकडे जातो म्हणून निघाले, परतलेच नाही

  • Yawal Jalgaon farmer commits suicide due to debts

    यावल - तालुक्यातील मनवेल येथे एका शेतकऱ्याने शेतातील नापिकी, कर्ज आणि केळीला हमिभाव मिळत नसल्याने कंटाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव सुरेश भागवत पाटील (70) असे आहे. त्यांनी स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आयुष्य संपवले. सुरेश भागवत पाटील यांचा मृतदेह पिळोदा शिवारामध्ये रविवारी सकाळी आढळून आला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सेंट्रल बँकेकडून 2.90 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याची परतफेड केळी विकून करणार असा त्यांचा संकल्प होता. परंतु, 3000 केळींची खोड कापणीयोग्य असताना त्याला भावच मिळाला नाही.


    सुरेश पाटील शनिवारी सकाळीच आपल्या घरातून नातेवाइकांकडे जातो असे सांगून निघाले होते. कुटुंबियांनी चौकशी केली तेव्हा ते त्या ठिकाणी पोहोचलेच नाही. याच दरम्यान रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पिळोदा शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह पाहून कुटुंबाने एकच टाहो फोडला. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. पाटील यांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. संबंधित कुटुंबाला धीर देण्याकरिता पंचायत समितीचे भाजपचे गटनेते दीपक पाटील, माजी सदस्य अरुण पाटील, संदीप सोनवणे, अनिल पाटील यांच्यासह नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. याबाबत नंदकिशोर रमण पाटील यांनी यावल पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  • Yawal Jalgaon farmer commits suicide due to debts
  • Yawal Jalgaon farmer commits suicide due to debts

Trending