Accident / Accident: लग्नातून परतणाऱ्या आदिवासी कुटुंबाची आयशर कठड्यावर चढली; 6 जखमी, एक जण गंभीर

एकाच्या डोळ्यात पडले गरम इंजिन ऑईल, रुग्णालयात उपचार सुरू

प्रतिनिधी

May 02,2019 09:48:00 AM IST

यावल - तालुक्यातील कुंड्यापाणी येथील लग्नाचे मूळ घेऊन परतणाऱ्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला अपघात झाला. वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन चढले. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या अपघातात सहा आदिवासी गंभीर जखमी झाले आहेत. यावल तालुक्यातील नावरे फाट्यावर ही घडली. सर्वच जखमी भातखेडा तालुका रावेर येथील रहीवाशी आहेत.

रावेर येथील आदिवासी तडवी समाजाचे लग्नानंतरचे मूळ घेण्यासाठी वऱ्हाडी मंडळी कुंड्यापाणी येथून गेली होती. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एमएच 12 सीएच 4767 या आयशर गाडीने ते प्रवास करत होते. जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये सुहाना संजीव तडवी (16), हसनूर फिरोज तडवी (17), कबीर तडवी (18), साहिल निजाम तडवी, सद्दाम सुपड तडवी (20), रज्जाक इमाम तडवी (22) अशी आहेत. वाहनाचा अपघात होताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने साखळी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे डॉक्टर फिरोज तडवी व कर्मचाऱ्यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. जखमींपैकी रज्जाक तडवी गंभीर जखमी असून डोळ्यांमध्ये गरम इंजिन ऑइल पडल्याने त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. तसेच डोक्याला देखील गंभीर दुखापत आहे. अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली.

X
COMMENT