Truck Accident: समोरा-समोर धडकले दोन भरधाव ट्रक, दोन्ही चालक गंभीर जखमी

प्रतिनिधी

Apr 01,2019 05:08:00 PM IST

यावल - येथील अंकलेश्वर बुऱ्हानपूर मार्गावर दोन भरधाव ट्रक समोरा-समोर धडकले आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये दोन्ही ट्रकचे समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, दोन्ही जखमी चालकांना जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल-किनगाव दरम्यान वाघोदा गाव आहे. या गावाजवळील नदीवर दोन पुल असूनही ते नवीन चालकांना सहसा दिसत नाही. अशात यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. याच ठिकाणी सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास चोपडा येथून यावलकडे कंटेनर क्रमांक यू.के. 04 सी.ए. 9322 येत होते. तर विरुद्ध दिशेने जाणारा ट्रक अचानक आला. पुल दोन असल्याने नेमके कुठे जावे हे चालकांना कळले नाही आणि दोन्ही ट्रक समोरा-समोर धकडले. यातील जखमी चालकांपैकी एक मोहम्मद उमर सलील चौधरी (55) हा मेरठचा आहे. दुसरा ड्रायव्हर मोहम्मद सईद (50) हा नागपूरचा रहिवासी आहे. दोघांनाही 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. यानंतर त्यांना जळगावच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या दोन्ही वाहनांमधील क्लीनर किरकोळ जखमी असून ते सध्या चालकांसोबत आहेत.

X
COMMENT