आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - येथील पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. मंगळवारी समोर आलेल्या निकालांमध्ये तर भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना पहिल्या फेरीत 298 मते पडली. तसेच त्यांना विजयी सुद्धा घोषित करण्यात आले. भाजपचे सुमित बाजोरिया यांना पहिल्या फेरीत 185 मते मिळाली होती. तर इतर 6 मते बाद ठरवण्यात आली आहेत. चतुर्वेदींचा विजय आधीच निश्चित असल्याचे समजून त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.

6 महिन्यांपूर्वीच केला शिवसेनेत प्रवेश

चतुर्वेदींनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेतून शिवसेनेचे तानाजी सावंत विधानपरिषदेचे सदस्य होते. ते उस्मानाबादमधून विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या जागी माजी मंत्री सतिष चतुर्वेदी यांचे चिरंजीव दुष्यंत चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार 31 जानेवारीला मतदान झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार हे निश्चित मानले जात होते.