आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2018 मध्ये या 12 चित्रपटांनी फिल्म इंडस्ट्रीला कमवून दिले 3500 कोटी रूपये, रिलीज झाले होते 70 चित्रपट...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नली दिल्ली- 2018 संपत आहे आणि काही दिवसांतच नवीन वर्ष येत आहे. 2018 बद्दल सांगायच झाल्यास, 2018 फिल्म इंडस्ट्रीसाठी सर्वात चांगले होते. 2018 मध्ये रिलीज झालेल्या 70 चित्रपटांनी फिल्म इंडस्ट्रीला 3500 कोटींचा व्यवसाय करून दिला आहे. तर 2017 मध्ये हे कलेक्शन 3150 कोटी होते. फिल्म एक्सपर्टने सांगितले की, असेच सुरू राहिल्यास येणाऱ्या वर्षात ही कमाई 4000 कोटींची होईल.


2018 मध्ये हे चित्रपट झाले 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील
2018 मध्ये 12 चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील आहेत. तर 2017 मध्ये फक्त 10 चित्रपट होते. या दोन वर्षांचे प्रदर्शन पाहता 2018 चांगले वर्ष माणले जात आहे. शाहरुखच्या झिरोने आतापर्यंत 90 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर रणवीरचा सिंबा 100 कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा आहे त्यामुळे हा आकडा 14 वर जाण्याची शक्यता आहे.
 

100 कोटींची कमाई करणारे 12 चित्रपट 
संजू- 342.53 कोटी
पद्मावत- 302.15 कोटी
2.0- 187.06 कोटी
रेस 3- 166.40 कोटी
बागी 2- 164.38 कोटी
ठग्स ऑफ हिंदोस्तान- 151.19 कोटी
बधाई हो- 137.54 कोटी
स्त्री- 129.90 कोटी
राजी- 123.84 कोटी
सोनी के टीटू की स्वीटी- 108.95 कोटी
गोल्ड- 104. 72 कोटी
रेड- 103.07 कोटी

बातम्या आणखी आहेत...