आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येदियुरप्पांनी भाजप नेत्यांना १८०० कोटींची लाच दिली, आमच्याकडे पुरावे : रणदीप सुरजेवाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी भाजप नेतृत्वाला तब्बल १८०० कोटींची लाच दिली होती. येदियुरप्पांच्या कथित नोंदवहीच्या आधारे काही माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हा आरोप केला. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपालामार्फत चौकशी करावी, असे आव्हानही काँग्रेसने दिले. दरम्यान, राहुल गांधी यांनी यानंतर लगेच “भाजपचे सर्वच चौकीदार चोर आहेत... नमो, अरुण जेटली, राजनाथसिंह...’ असे ट्विट केले. हे सर्व आरोप येदियुरप्पांनी फेटाळले आहेत. 

 


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन हा खळबळजनक आरोप केला. ज्या नोंदवहीत प्रत्येक पानावर येदियुरप्पांची स्वाक्षरी आहे त्यातील नोंदींनुसार २००७ ते २०११ दरम्यान येदियुरप्पा यांनी भाजपच्या तत्कालीन ज्येष्ठ नेत्यांना १८०० कोटी रुपये दिल्याचे स्पष्टपणे समोर येत आहे. हाच संदर्भ येदियुरप्पा व केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्यात झालेल्या चर्चेतूनही बाहेर आला होता, असे सुरजेवाला म्हणाले.

 

 

खोटे मुद्दे फोल ठरल्याने आता कारस्थान : भाजप
काँग्रेसने आतापर्यंत मांडलेले सर्वच मुद्दे फोल ठरल्याने आता नैराश्यामुळे काँग्रेस अशा कटकारस्थानाचा आधार घेत असल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या एका मंत्र्याने दिलेली कागदपत्रे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाइतकीच विश्वासार्ह आहे, अशी मल्लिनाथी शहा यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...