आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अभिनेत्याच्या खऱ्या बहिणीचा झाला निकाह, भावांनी बहिणीला उचलून केली पाठवणी तर झाली इमोशनल, लग्नात पोहोचली टीव्हीची 'नायरा', दिव्यांका त्रिपाठीसह शोची स्टारकास्ट : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'ये रिश्ता क्या कहलाता है' सीरियलमध्ये कार्तिकची भूमिका करणारा अभिनेता मोहसिन खानची छोटी बहीण जेबाचा निकाह झाला. यावेळी मोहसिन एका परफेक्ट भावाच्या रोलमध्ये दिसला. निकाहामध्ये मोहसिन च्या बहिणीने ब्राइट रेड कलरचा लेहंगा परिधान केला होता आणि ती परफेक्ट ट्रेडिशनल मुस्लिम ब्राइड दिसत होती. दुसरीकडे मोहसिनचे जीजाजी ताहा क्रीम- गोल्डन कलरची शेरवानी घातली होती. ताहा हे डॉक्टर आहेत.  निकाहचे काही फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये मोहसिन, भावासोबत बहिणीला उचलून तिची पाठवणी करताना दिसत आहे. दरम्यान जेबा खूप इमोशनल झालेली दिसत आहे. 

 

निकाहमध्ये दिसली सीरिअलमधील नायरा...
- शोमध्ये शिवांगी जोशी म्हणजेच नायरा मोहसिनच्या अपोजिट दाखवली आहे. हे टीव्ही कपल फॅन्समध्ये खूप पॉप्युलर आहे आणि लोकांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडते. ऑनस्क्रीनव्यतिरिक्त ऑफस्क्रीनही हे दोघे डेट करत आहेत. नायरा, मोहसिनच्या बहिणीच्या निकाहमध्ये ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. 

 

- मोहसिनच्या बहिणीच्या लग्नात 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची स्टारकास्टही पोहोचली. याव्यतिरिक्त दिव्यांका त्रिपाठी, पारुल चौहानसहित अन्य सेलेब्सही पोहोचले. 

बातम्या आणखी आहेत...