health / संक्रमित डासांमुळे होतो पित्त ज्वर, असा करा स्वतःचा बचाव

 वॅक्सीनेशनमुळे जीव वाचू शकतो

दिव्य मराठी वेब

Aug 12,2019 05:17:00 PM IST

हेल्थ डेस्क- येलो फीवर म्हणजेच पित्त ज्वर डासांच्या एका खास जातीमुळे होतो. विशेष म्हणजे काही देशामध्ये या डासांमुळे खूप हाहाकार माजला आहे. जर तुम्ही भारतातून अफ्रीकेत आणि साउथ अमेरिकेसारख्या देशात जात असाल तर, जाण्यापूर्वी तुम्हाला याचे वॅक्सीनेशन लावण्याची गरज आहे. या देशांमध्ये पित्त ज्वराची भरपूर प्रमाणात लागन आहे.

काय आहे पित्त ज्वर
पित्त ज्वराच्या व्हायरसमुळे एक तीव्र हॅमरॅजिक रोग होतो, हा संक्रमित डासांमुळे पसरतो. या रोगाचा परिणाम संपूर्ण शरिरावर होतो.

पित्त ज्वराचे लक्षण
- ताप,डोके दुखी, तोंड, नाक, कान, आणि पोटात रक्तस्राव, उल्टी, लिव्हर आणि किडनीशी संबंधित रोग, पोटदुखी, आणि काविळ.


पित्त ज्वरावरील उपाय
पित्त ज्वरामुळे अनेक गंभीर आजार होतात. पित्त ज्वर झालेल्या रुग्णांमधील 50 टक्के रुग्ण मरण पावतात. पण याच्या वॅक्सीनेशनमुळे जीव वाचू शकतो.

X
COMMENT