आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yes Bank | Paytm Come To Us; Phone Pay If Your Platform Was That Simple, Then I Would Have Come

पेटीएम- आमच्याकडे या; फोन पे- तुमचा प्लॅटफॉर्म इतका सोपा असता तर निश्चित आलो असतो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येस बँक प्रकरणाचा एटीएम आणि बँकिंग प्रणालीवर परिणाम झाला आहे. यूपीआय प्रणालीवरही याचा मोठा परिणाम झालेला दिसत आहे. सर्वात जास्त धक्का फोन पेला बसला आहे. येस बँक प्रकरणामुळे शुक्रवारी दिवसभर फोन पेची सेवा बंद होती.  अचानक सेवा बंद झाल्यामुळे वापरकर्त्यांनादेखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक जणांचे पैसे फोन पे वॉलेटमध्येच अडकले. तसेच यामुळे अनेक जणांना खरेदी करता आली नाही, तर दुसरीकडे पेटीएम पेमेंट बँकेने फोन पेला टॅग करत एक ट्विट केले आहे. पेटीएमने म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला पेटीएमच्या यूपीआय प्लॅफॉर्मवर आमंत्रित करत आहोत. यामुळे तुमच्या व्यवसायात दुपटीने वाढ होऊ शकते. चला, वेगाने पुढे जाऊयात. यावर फोन पेनेही उत्तर दिले आहे.  फोन पेने ट्विट करत लिहिले की, जर तुमचा प्लॅटफॉर्म एवढा सोपा असता तर आम्ही स्वत:च तुमच्याशी संपर्क साधला असता. जर आम्ही आमच्यासोबत दीर्घ काळापासून असणाऱ्या भागीदारांना वाईट काळात सोडले तर आमच्या वापसीला काहीच अर्थ उरणार नाही. आमचा फॉर्म तात्पुरता आहे, मात्र क्लास कायमस्वरूपी आहे. फोन पेकडून बँकिंग सेवांसाठी येस बँकेचा वापर


बँकिंग सेवांसाठी फोन पेकडून येस बँकेचा उपयोग केला जात होता. यामुळे येस बँकेवरील प्रतिबंधामुळे फोन पेच्या सेवेवर परिणाम झाला होता. यासंदर्भात फोन पेच्या सीईओंनी एक ट्विट केले आहे. ते म्हणाले, येस बँकेमुळेच फोन पे अॅपमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरापासूनच फोन पेच्या यूपीआय, कार्ड आणि वॉलेटसारख्या सेवा सुरू झाल्या. 
 बातम्या आणखी आहेत...