आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - संकटात सापडलेल्या येस बँकेला अखेर सरकारचा आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनरबांधणीचा प्रस्ताव सरकारपुढे मांडला होता. त्यालाच शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनरबांधणीच्या प्लॅनमध्ये येस बँक आणि सरकारला एसबीआयकडून मदत मिळणार आहे. त्यासोबतच, इतर गुंतवणूकदारांचा सध्या शोध घेतला जात आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण शुक्रवारी म्हणाल्या- "आरबीआयने येस बँकेच्या बुनरबांधणी प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेतील 49 टक्के इक्विटीमध्ये गुंतवणूक करणार आहे. उर्वरीत इक्विटीसाठी गुंतवणूकदारांचा सध्या शोध घेतला जात आहे. एसबीआयकडून गुंतवणूक केल्या जाणाऱ्या इक्विटीपैकी 26% इक्विटी 3 वर्षांसाठी लॉक केल्या जाणार आहेत. इतर गुंतवणूकदारांना 75% इक्विटी अशाच पद्धतीने लॉक कराव्या लागणार आहेत." नवीन प्लॅनसाठी येत्या 7 दिवसांत मंडळ तयार केले जाईल असेही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.
इतर बँक येस बँकेत गुंतवणूक करणार
अॅक्सीस, कोटक महिंद्रा, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे की, ते बुडीत असलेल्या येस बँकेत गुंतवणूक करणार आहे. देशातील पाचव्या क्रमांकाची बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे की, येस बँकेचे पाच टक्के स्टॉक्सच्या बदल्यात ते 1 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करतील. तसेच, अॅक्सीस बँकदेखील 5 स्टॉक्स शेअर्सच्या बदल्यात 600 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास तयार आहे. यासोबतच, एसडीएफसीदेखील पाच टक्के स्टॉक्सच्य बदल्यात 1 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास तयार आहे. या बँकांसोबतच कोटक महिंद्रा बँकेने सांगितले की, ते 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन येस बँकेचे 50 कोटी इक्वीटी शेअर्स घेतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.