आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • YES Bank Withdrawal Limit: Daily Cash Withdrawal Limit Is 50 Thousand; All You Need To Know About On Yes Bank Crisis

एका महिन्यात फक्त 50 हजार रुपयेच काढू शकतील ग्राहक; तुमच्या पैशांचे काय होईल, 6 प्रश्नोत्तरामध्ये जाणून घ्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- आरबीआयने ठोक पैसे नसल्यामुळे सेस बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध लादले आहेत. आता बँकेचे ग्राहक एका महिन्यात फक्त 50 हजार रुपये काढू शकतील. यामुळे बँकेने ग्राहकांच्या खात्यातून जाणाऱ्या ईएमआय, एसआयपी आणि इंश्योरेंस प्रीमियमबद्दल असलेल्या शंकांचे 6 प्रश्नोत्तरामध्ये निरासन केले आहे. 

1. सेस बँकेत सॅलरी अकाउंट असलेल्या ग्राहकांचे काय होईल ?

उत्तर: जर तुमचे सॅलरी अकाउंट सेस बँकेत आहे आणि पगार 50 हजारांपेक्षा कमी आहे, तर घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला तुमची पगार मिळत राहील. पण, जर तुमचे पगार 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो. तुमचे सॅलरी, करंट किंवा सेविंग कोणतेही अकाउंट असले, तरी ग्राहक 1 महीन्यात फक्त 50 हजार रुपये काढू शकतील. सॅलरी अकाउंटसाठी तुम्ही तुमच्या कंपनीला इतर बँकेत खाते उघडण्यास सांगू शकतात.

2. ईएमआय, एसआयपी किंवा इंश्योरेंसचा हप्ता 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर काय होईल ?

उत्तर: 50 हजार किंवा त्यापेक्षा कमीचा हप्ता असेल तर काहीच परिशानी होणार नाही. पण, जर ईएमआय, एसआयपी किंवा इंश्योरेंसचा हप्ता 50 हजारांपेक्षा जास्त असेल, तर तो बाउंस होईल. यामुळे तुम्ही ईएमआय, एसआयपी किंवा इंश्योरेंस भरण्याचा सोर्स बदलू शकता.

3. कोणत्या परिस्थितीत 50 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम मिळेल?

उत्तर: जर ग्राहक किंवा त्यावर अवलंबुन असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या उपचारासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम मिळू शकते. बँकने सांगितल्यानुसार मेडिकल इमरजेंसी, एजुकेशन फीस किंवा लग्नासाठी तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत अमाउंट काढू शकता.

4. कधीपर्यंत ही समस्या दूर होईल?

उत्तर: सेस बँके आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर आरबीआयने 30 दिवसांसाठी बोर्डाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले आहे. एसबीआयचे माजी डीएमडी आणि सीएफओ प्रशांत कुमार यांना बँकेचा प्रशासक नेमले आहे. आरबीआय लवकरच बँकेसाठी रीस्ट्रक्चरिंग प्लॅन सादर करणार आहे. बँकेला वाचवण्यासाठी सरकारने आरबीआयला पुढे केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेस बँकेत शेअर्स खरेदी करण्यासाठी एसबीआयला सरकारने मंजुरी दिली आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. येस बँकेत भागीदारी खरेदी करणाऱ्या कंसोर्शियमला एसबीआय लीड करेल. इकोनॉमिक टाइम्सने सांगितल्यानुसार, एसबीआय आणि एलआयसी मिळून येस बँकेची 49% भाग खेरी करणार आहे. 

5. बँक कधीपासून संकटात आहे ?

उत्तर: भारतात प्रायवेट सेक्टरमधील चौथी सर्वात मोठी बँक येस बँक आहे. ऑगस्ट 2018 पासून बँक आर्थिक संकटात आहे. त्यावेळेस आरबीआयने बँकेचे संचलन आणि कर्जात बुडल्यामुळे तत्कालीन प्रमुख राणा कपूरला 31 जानेवारी 2019 पर्यंत पद सोडण्यास सांगितले होते. त्यांचे उत्तराधिकारी रवनीत गिल यांच्या अध्यक्षेत बँकेने संकटग्रस्त एनपीएची सूचना प्रकाशित केली. बँकेला मार्च 2019 च्या तिमाहीत पहिल्यांदा घाटा झाला.

6. बँक बुडाल्यावर तुमच्या पैशांचे काय होईल ?

उत्तर: डिपॉजिट इंश्योरेंस अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अक्ट 1961 अंतर्गत बँक फेल (बंद) झाल्यावर खातेधारकाची 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम सुरक्षित राहील. या वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात बँक गॅरेंटीला 1 लाखांवरुन 5 लाख रुपये केले आहे. पीएमसी बँक घोटाळ्यानंतर सरकारचे बँक गॅरेंटीवर लक्ष गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...