आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारामती - 'सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष एकत्र येणार असले तरी या अाघाडीतील सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. यासंदर्भात येत असलेल्या सर्व बातम्यात काहीही तथ्य नाही. जाेपर्यंत अामदारांचा अाकडा १४५ च्या पुढे जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही,' असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. भाजपाकडे बहुमत असतानाही त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करत आहेत. आमदारांचे संख्याबळ १४५ च्या पुढे जात नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला राहावं लागेल. एक मात्र खरे की राष्ट्रवादी असाे किंवा इतर दाेन पक्ष, अामच्यापैकी काेणाचाही अामदार फुटणार नाही. अनेक जण पहिल्यांदाच निवडून अाल्यामुळे फाटाफूट हाेणार नाही. पक्ष साेडल्यावर काय निकाल लागताे हे त्यांनी 'साताऱ्यात' पाहिले अाहे, असा टाेलाही पवारांनी उदयनराजेंचे नाव न घेता लगावला.
पुन्हा मतदानाची वेळ येणार नाही : अजित पवार
'अवकाळी पावसाने शेतकरी मोडून पडलाय. मात्र, राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अत्यंत ताेकडी अाहे. त्यांनाही काही अडचणी असतील. ही मदत अाणखी वाढवून मिळावी यासाठी अाम्ही राज्यपालांची भेट घेणार अाहाेत. मात्र, काहीही झाले तरी मतदारांना पुन्हा मतदानाची वेळ येणार नाही. राज्याला स्थिर सरकार देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल,' असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.