श्रीमंत बनण्याचे आठ / श्रीमंत बनण्याचे आठ सोपान

धर्म डेस्क

धर्म डेस्क

May 27,2011 11:13:53 AM IST

आजच्या आर्थिक युगात प्रत्येक जण पैशामागे धावतोय. धनप्राप्तीच्या लालसेने लोक नातेसंबंधही विसरत आहेत. अशा वेळी आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्यातल्या त्रुटी आणि सकारात्मक गोष्टी समजून घेणे आवश्यक ठरते. केवळ दुसर्यावर आरोप करण्याने आपली प्रगती शक्य नाही.
तुम्हाला परिस्थिती अनुकूल बनवावं लागेल. जेव्हा तुम्ही परिस्थिती हाताळायला शिकाल तेव्हा तुमची विजयी घोडदौड सुरू झालेली असेल.
आपल्याला यशस्वीतेकडे नेणार्या आठ पायर्या पुढीलप्रमाणे...
वेळेचं सन्मान राखायला शिका.
आजची कामे उद्यावर ढकलू नका.
आपल्या आवडीच्या क्षेत्रत काम करा म्हणजे तुम्ही अधिक यशस्वी व्हाल.
पूर्वनियोजन करून कामाला सुरूवात करा आणि सुरूवात करायला चालढकल करू नका.
काय करायचे हे एकदा निश्चित झाले की समर्पित होऊन काम करा.
अधिक धन कमविण्यासाठी अधिक योग्य आणि अनुभवी लोकांशी संपर्क ठेवा.
कुणाचं मन दुखवू नका पण सत्य बोला. सत्य बोलण्याचा अहंकार नको तर धैर्य असू द्या.

X
COMMENT