Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

योग गाइड : योग केव्हा, किती, कसा आणि कुठे करावा ज्यामुळे लाभ होईल

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 21, 2019, 12:05 AM IST

21 जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून साजरा केला जाताे. जगभरात याेगाचे महत्त्व अाता लक्षात येत अाहे

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  21 जून हा दिवस जागतिक याेग दिवस म्हणून साजरा केला जाताे. जगभरात याेगाचे महत्त्व अाता लक्षात येत अाहे. याेगा हा प्रकार काेणत्याही धर्माला वा अध्यात्माला अनुसरुन नसून ताे अाराेग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचाच एक उत्तम प्रकार अाहे, हे अाता सर्वत्र अधाेरेखित हाेते अाहे. त्यामुळेच या दिवशी विविध उपक्रमांनी याेगा या प्रकाराला अापलंस करण्याचा प्रयत्न हाेताना दिसताे. उद्याच्या (दि. २१) याेग दिवसानिमित्त योगा आणि आहाराचा काही संबंध आहे का? योगाचे काही दुष्परिणाम आहेत का? आहार कोणता आणि कधी घ्यावा? योगा कधी करावा? आदी प्रश्न नेहमी विचारले जातात, या प्रश्नांची नेहमी चर्चा होत असते. योगगुरू, प्रशिक्षक यांनाही योगसाधक असे प्रश्न नेहमी विचारत असतात. योगविद्या गुरूकुलचे कुलगुरू डॉ. विश्वास मंडलिक यांना नेहमी विचारल्या जाणार्‍या योगाविषयीच्या प्रश्नांची त्यांनीच दिलेली उत्तरे.

  पुढे वाचा,
  योगाभ्यास केव्हा करावा?
  व्यायाम आणि योगात काय फरक आहे?
  योगाचा दुष्परिणाम आहे का?
  महिलांनी योगा कधी करावा?
  आजारी माणसाने योगा करावा का?
  आहार केव्हा आणि कोणता घ्यावा आणि इतरही प्रश्नांची उत्तरे..

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  योगाभ्यास केव्हा करावा?
  दोन-चार दिवस फॅड म्हणून योगा करायला नको. योगा कधीही आणि केव्हाही करता येतो. सर्वप्रथम कोणत्या वेळी योगा करायचा ती वेळ ठरवावी. तिचा कालावधी ठरवावा. आज पंधरा निमिटे केली उद्या दोन तास केल्यास त्याचा फायदा होत नाही. आपले शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी दररोज पाऊण तासाचा योगा आवश्यक असतो, असा अनुभव आहे. योगा सहसा सकाळी करावा. ६ ते ७ ही वेळ योग्य आहे. सकाळी शरीर उत्साही आणि मन प्रसन्न असते. वातावरण शुद्ध असते. योगाने आयुष्य रिफ्रेश होते.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  महिलांनी योगा कधी करावा?
  योगा बालक सोडून सर्वांनी करावा, असा प्रकार आहे. योगा करताना महिलांनी काही पथ्ये पाळावी. विशेषत: महिलांनी मासिक पाळी व अपत्यप्राप्ती दरम्यान योगा करु नये.


  योगा करताना काय पथ्ये पाळावीत?
  योगा करताना व्यसने टाळली पाहिजेत. चहा, कॉफी घेणेही वर्ज्य केले पाहिजे. धूम्रपान, मद्यपान करू नये. तरच योगाचा खरा अभ्यास करता येईल आणि त्याचा फायदा होईल. सतत योगा केल्याने व्यसनेही सुटण्यास मदत होते.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  व्यायाम आणि योगात काय फरक आहे?
  व्यायामात जलदगती हालचालीला प्राधान्य आहे. आसनात सावकाश हालचाल होते. व्यायामाने शारीरिक विकास होतो तर योगासनाने मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास होतो. व्यायामात स्नायू संवर्धन होते. पण ते ताठर बनतात, योगात स्नायू लवचिक होतात. व्यायाम करताना जीमचा खर्च येतो, पोषण आहारावर खर्च होतो. घरच्या घरी योगाभ्यास करता येतो. त्यामुळे पैसेही वाचतात.
   

  योगाचा दुष्परिणाम आहे का?
  योगाने काहीच दुष्परिणाम होत नाही. उलट एखाद्या अवयवासाठी योगा करीत असताना पूर्ण शरीराला फायदा होतो. योगामुळे नुकसान झाले, असे आजपर्यंत सिद्ध झाले नाही. त्यामुळे योगा हा आरोग्यमय जीवनाचा सोपा आणि सरळ मार्ग आहे.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  योगाभ्यास कुणी करावा, तो करण्यासाठी वयाचे काही बंधन आहे का?
  योगाभ्यास हा वयाच्या 12 ते 80 वर्षे वयापर्यंत केला जाऊ शकतो. योगा कुणी करावा, याचे विस्तृत विवेचन हठप्रदीपिका या ग्रंथात केले आहे. युवक, वृद्ध, व्याधीग्रस्त किंवा अशक्त व्यक्तीही योगा करू शकते. याला अपवाद केवळ बालक आहे. बाल्यावस्थेत शरीराची वाढ आणि आंतरइंद्रियांची रचना पूर्ण झालेली नसते. त्यांच्या हाडांची वाढ झालेली नसते. त्यामुळे योगामुळे पडणारा ताण त्यांचे शरीर पेलू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर दुष्परिणाम होतो. म्हणून बालकांनी योगा करू नये.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  आहार केव्हा आणि कोणता घ्यावा ?
  योगात आहारालाही खूप महत्त्व आहे. त्यासाठी आहार-विहाराची बंधणे पाळणे आवश्यक आहे. योगा करताना पोट खाली असावे. कोणताही आहार घेतल्यावर तीन-साडेतीन तासानंतर योगा करावा. पाणी, पेय घेतल्यावर एक तासाने योगा करायला हरकत नाही. योगा केल्यावर एक तासाच्या आत पेय आणि दोन तासांपर्यंत जेवण करणे अयोग्य आहे. मांसाहार हा योगात अजिबात चालत नाही.


  आजारी माणसाने योगा करावा का?
  योगा कोणालाही करता येतो, काही रोग टाळण्यासाठी किंवा रोग बरा करण्यासाठी योगा केला जातो. दुर्धर आजार, मानसिक आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य राहील.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  योगाभ्यास कुठे करावा?
  योग करताना निवडलेली जागा मोकळी, हवेशीर आणि स्वच्छ असावी. प्रकाश मंद असावा. उष्ण प्रकाश नको. ओलसर भिंती, जमीन नको. ही जागा गोंगाटाच्या ठिकाणी नको. तेथे निरव शांतता असावी. हालचाली सर्व दिशांना मोकळेपणाने करता आल्या पाहिजे. त्यासाठी ६ बाय ४ एवढी जागा पाहिजे.


  पोशाख कसा असावा?
  योगाभ्यास करताना पोशाखालाही महत्त्व आहे. पोशाख सैल असावा. यामुळे शरीराच्या हालचाली विनाअडथळा होऊ शकतात. पुरुषांनी अर्धी विजार, (पँट), बनियन, किंवा गंजीफ्रॉक वापरावा. महिलांसाठी पंजाबी ड्रेस सर्वात चांगला आहे. स्लॅक्स वापरता येईल. शिवाय साडीही चालू शकते. महिलांनी केससांभार बांधून ठेवला पाहिजे. कापड किंवा चटई अंथरून बसावे.

 • Yoga Guide: When and how, where and how to do Yoga, it will benefit

  हेदेखील लक्षात ठेवा...
  > शक्ती खर्च न होता शक्तीचा संचय होतो.
  > आसनांचा अभ्यास व्याधींवर उपचारात्मक म्हणून करता येतो.
  > अन्नपदार्थात मीठ, मिरची, मसाले आदी जास्त प्रमाणात टाकू नये. ते हानिकारक आहे.
  > फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ खाऊ नये.
  > योगाने स्फूर्ती आणि उत्साह वाढतो. स्नायू बळकट होतात.
  > प्रत्येक ऋतूत योगाभ्यास करता येईल.
  > रोगप्रतिकारशक्ती वाढते, तणावावर नियंत्रण ठेवता येते.
  > पचनक्रिया, मज्जासंस्था आणि श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते.
  > कपडे भडक घालू नये, शक्यतो पांढरे रंगाचे घालावे. ते शीतल असतात.
  > योगाभ्यासामुळे क्लब, जीमचा खर्च वाचतो.
  > व्यक्तीमत्व फुलते आणि नैतिकता येते.

Trending