आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yoga Guru Baba Ramdev & Giriraj Singh Comment On Population Control Law And Two Baby Born Rule

लोकसंख्या नियंत्रणावर बाबा रामदेव म्हणाले- 'तिसरे आपत्य झाल्यावर मतदानाचा हक्क काढून घ्यावा', गिरिराज यांनी दिले समर्थन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेगुसराय(बिहार)- येथील बेगुसरायचे भाजप खासदार गिरिराज सिंह यांनी लोकसंख्या नियंत्रणावर योगगुरू बाबा रामदेव यांनी दिलेल्या विधानाचे समर्थ केले आहे. रामदेव म्हणाले होते की, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करायला हवा. त्यासोबतच तिसरे आपत्य झाल्यास त्याचा मतदानाचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार काढून घेण्यात यावा. गिरिराज म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणाबाबतीत रामदेव बाबांनी दिलेल्या विधानाला आपल्याला सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. विकास करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण खूप महत्तावेच आहे आणि यासाठी कायदा व्हायलाच हवा.

 

बाबा रामदेव रविवारी हरिद्वारमधील एका प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोललेल होते. ते म्हणाले होते की, आता कायदा केल्यावरच लोकसंख्या नियंत्रणात येईळ. त्यांनी 'हम दो, हमारे दो' याचे समर्थन करत तिसरे आपत्य झाल्यास त्याला मतदानाचा हक्क देण्यात येउ नये असे वक्तव्य केले होते. कोणत्याही जातीचेच असो, त्यांना निवडणूक लढवणे आणि सरकारी नोकरीत सवलत मिळता कामा नये, असे रामदेव बाबा म्हणाले होते.


भविष्याच्या दृष्टाने लोकसंख्या नियंत्रण महत्त्वाचे- गिरिराज
बेगुसरायमध्ये गिरिराज म्हणाले की, लोकसंख्या नियंत्रणावर कायदा आणण्याच्या बाबतीत मी नेहमी सकारात्मक असेल. या मुद्द्यावर कायदा असणे गरजेचे आहे, ज्यामुळे देशातील साधन सामग्रीचा योग्य वापर होईल. शोधकर्त्यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात पाणी आणि अन्नाचे संकट येणार आहे. त्यामुळे चांगल्या भविष्यासाठी लोकसंख्या नियंत्रण गरजेचे आहे.


ओवसी यांनी रामदेव बाबाच्या वक्तव्याचा घेतला समाचार
योग गुरूंच्या वक्तव्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रीया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ओवेसींनी ट्वीटमध्ये लिहीले, ''लोकांना असंविधानीक गोष्टी बोलण्यापासून थांबवण्यासाठी कोणताच कायदा नाहीये, पण बाबा रामदेवच्या वक्तव्यांना महत्तव का द्यायचे? ते योग करू शकतात, याचा अर्थ हे नाही की, आता मोदी तिसरे आपत्य असल्यामुळे त्यांचे अधिकार काढून घेतले जातील.''