Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yoga-sex-learn-how-to-bring-not-press-control

कामवासना... दाबू नका, ताब्यात ठेवा

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 27, 2011, 12:15 PM IST

कामवासना दाबून ठेवायला नव्हे तर नियंत्रणात ठेवायचे तंत्र योगविद्या शिकविते.

  • yoga-sex-learn-how-to-bring-not-press-control

    कामवासना दाबून ठेवायला नव्हे तर नियंत्रणात ठेवायचे तंत्र योगविद्या शिकविते. मनुष्याने काम वासना आणि भोगविलासापासून सदा दूर राहिले पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे असे विचार नेहमी योग आणि धर्म अध्यात्मात एेकायला मिळतात. परंतु काम भावना दाबून टाका, असे कधीही सांगण्यात येत नाही.
    योग जगतात अष्टांगयोगाला प्रमाण मानण्यात येते. योगात प्रगती करण्यासाठी यम आणि नियमांचे पालन अत्यावश्यक असते. यम यामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे ब्रह्मचर्य पालन.
    अष्टांगयोगात ब्रह्मचर्यपालनाला खूप महत्त्व आहे. जो माणूस ब्रह्मचर्य पालन करणार नाही, त्याची कुंडलिनी जागृतीकडे वाटचाल असंभव आहे. भीन्न लिंगी आकर्षणामुळेच ब्रह्मचर्य पालनात अडचण येते असे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मनुष्य आणि पशू यांमध्ये आहार, भय, निद्रा आणि मैथून अर्थात काम या बाबी समान आहेत. मनुष्याची विशेषता म्हणजे त्याला बुद्धी ही बाब अधिक आहे. या बुद्धीच्या विकासाचे तंत्र योगात आहे. योगसाधनेने कामभावनेवर नियंत्रण अथवा संयम ठेवणे सहज शक्य होते.

Trending