Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yoga-time-management

... हा रस्ता धन समृद्धीकडे जाणारा आहे

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 29, 2011, 02:11 PM IST

केवळ योगासने म्हणजे योग असे काहीजण समजतात पण तसे नाही. अन्यथा लवचिक शरीराचे सर्कशीत काम करणारी मंडळी

  • yoga-time-management

    योगाची व्याख्या एका वाक्यात करायची तर म्हणता येईल की जीवन जगण्याची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे योग. केवळ योगासने म्हणजे योग असे काहीजण समजतात पण तसे नाही. अन्यथा लवचिक शरीराचे सर्कशीत काम करणारी मंडळी कधीच योगी बनली असती. हिंदू धर्माने किंवा भारतीय संस्कृतीने दिलेली ही एक समृद्ध जीवनपद्धती आहे. कोणत्याही धर्म, उपासना पंथाची व्यक्तीे योग करू शकते. म्हणूनच पाकिस्तानसह जगातील लक्षावधी जिज्ञासू योगाकडे वळताहेत.
    योग जीवनपद्धती केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिक जीवनातही यशस्वी करते. वेळेचे महत्त्व आेळखून जीवन जगणे हे योगच आहे. वेळेचे महत्त्व जाणलेले अनेक जन करोडपती झाल्याची उदाहरणे आहेत. दारिद्य्रातून मुक्त होण्यासाठी वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरते.
    सदैव ध्यानात ठेवा की आजचे काम उद्यावर ढकलू नका. आजचे काम आजच पूर्ण करा. कारण येणार्या उद्याची कामेही तुम्हाला करायचीच आहेत. मग गेलेल्या कालची कामे कधी करणार. वेळेला मागून नव्हे पुढूनच पकडता येतं, हे त्रिकालबाधित सत्य कधीच विसरू नका.
    जीवनातील प्रत्येक सेकंद मूल्यवान आहे. गेलेला क्षण परतून येऊ शकत नाही. जगतला कोणीही मनुष्य गेलेले दिवस खरेदी करू शकेल इतका श्रीमंत नाही. शक्य असेल तेव्हा आपल्या आवडीचे काम करा. कारण आवडीचे कामच मनुष्य चांगल्या रीतीने करू शकतो, हे मानसशास्त्रीय सत्य आहे. चांगल्या विचारांचे चिंतन, वाचन करणे हे सुखी समृद्ध जीवनासाठी आवश्यकच आहे.

Trending