Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yogasana for summer in Marathi

रक्तदाब कमी झाल्यास या योगासनांचा होईल फायदा

हेल्थ डेस्क | Update - Apr 17, 2019, 12:03 AM IST

उन्हाळ्यात जास्त मेहनतीची योगासने करणे टाळावे. अशा प्रकारच्या योगासनांमुळे उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि कमी रक्तदाबाच्य

 • yogasana for summer in Marathi

  ज्यांचा रक्तदाब सामान्यापेक्षा कमी राहतो, त्यांनी उन्हाळ्यात जास्त मेहनतीची योगासने करणे टाळावे. अशा प्रकारच्या योगासनांमुळे उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि कमी रक्तदाबाच्या रुग्णाचा रक्तदाब आणखी कमी होतो.


  या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही तुम्हाला साधी आणि परिणामकारक योगासने सांगत आहोत. यामुळे कमी रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. ही योगासने नियमित केल्यास आरोग्यास अनेक फायदे पोहोचतात.


  1.चलित ताडासन
  असे करा : दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे जोडत सरळ सावधानच्या स्थितीत उभे राहा. आता श्वास घेत दोन्ही हात हळूहळू डोक्याच्या वर ताठ करा. नंतर हळूच पंजावर या. आता शरीराला पूर्णपणे वरच्या दिशेने ताण देत गुडघे न वाकवता ३० सेकंद ते १ मिनिटे चाला. हेच चलित ताडासन आहे. हे आसन २ ते ३ वेळा आपल्या शारीरिक क्षमतेनुसार करू शकता.


  फायदा : संपूर्ण शरीर चांगल्या प्रकारे ताणले जाते.
  - पायांना बळ मिळते.
  - मेरुदंड लवचिक होतो.
  - पाठीच्या कण्याच्या वेदना दूर होतात. हाडे बळकट होतात.
  सावधगिरी : चक्कर आल्याचे जाणवत असेल तर करू नका.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन आसनांची माहिती...

 • yogasana for summer in Marathi

  2. अर्द्धकटी आसन 
  असे करा : खांद्यापर्यंत आपल्या पायांचे अंतर ठेवत सरळ उभे राहा. आता दोन्ही हात खांद्याच्या सरळ समोर समांतर घेऊन या. दोन्ही पाय स्थिर ठेवत श्वास घ्या आणि दोन्ही हात उजवीकडे यथासंभव घेऊन जा आणि श्वास सोडत पुन्हा समोरच्या दिशेने घेऊन या. अशाच प्रकारे डावीकडेही श्वास घेत जा आणि श्वास सोडत पुन्ह समोरच्या दिशेने घेऊन या. यादरम्यान कमरेच्या खालचा भाग स्थिर असावा. हे आसन १० वेळा करा. 


  फायदा 
  - याचा थेट परिणाम कंबर, पाठ, मांड्या आणि खांद्यावर होतो. 
  - फुप्फुसांसाठी फायद्याचे. 
  - पचनक्रिया वाढवण्यामध्येही मदत करते. 
  - कंबर, पाठ, मांड्या व खांद्यातील रक्त प्रवाह सुधारतो. 
  सावधगिरी : तुम्हाला चक्कर येत असेल हे आसन करू नका. अन्यथा हा त्रास वाढू शकतो. 

 • yogasana for summer in Marathi

  3.चलित नौकासन : असे करा : दोन्ही पाय सरळ ठेवत दंडासनामध्ये बसा. दोन्ही हातात काल्पनिक पेडल पकडून श्वास घेत आपले शरीर मागच्या दिशेने घेऊन जात दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वरच्या दिशेने घेऊन जा. श्वास सोडत समोर पायांकडे दोन्ही हात घेऊन जा. या क्रियेमध्ये तुम्ही काल्पनिक नाव चालवत आहात. असेे १० वेळा सरळ, १० वेळा उलट्या दिशेने असे नौकासन करा. 


  फायदा 
  - पचन क्रिया चांगली होऊन लठ्ठपणा व पोटाची अतिरिक्त चरबी दूर होते. 
  - किडनी, लिव्हर क्रियाशील राहतात. 
  सावधगिरी : सायटिका, पाठ, पोटदुखी असल्यास अनुभवी प्रशिक्षकाच्या सल्ल्याने हे आसन करा. 

Trending