Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yogasana for summer information marathi

उन्हाळ्यात शीतली प्राणायाम, शवासनाने दूर होईल उष्णता 

हेल्थ डेस्क | Update - Apr 12, 2019, 12:03 AM IST

नियमितपणे काही वेळ ही योगासने केलीत तर उष्णता कमी होऊ शकते. यामुळे मेंदूदेखील शांत राहण्यास मदत होते.

 • yogasana for summer information marathi

  उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही कित्येक प्रकारचे उपाय करता, परंतु जर नियमितपणे काही वेळ ही योगासने केलीत तर उष्णता कमी होऊ शकते. यामुळे मेंदूदेखील शांत राहण्यास मदत होते.


  1. शीतली प्राणायाम
  प्रथम संपूर्ण शरीराला सैल आणि शांत ठेवा आणि डोके, घसा आणि पाठीच्या कण्याला योग्य स्थितीमध्ये ठेवून आरामात बसा. या प्राणायामात तोंड उघडून जिभेला नालीसारखे करा आणि नालीद्वारे हळूहळू श्वास आत ओढा. नंतर तोंड बंद करून काही वेळापर्यंत श्वास आत रोखून ठेवा. नंतर नाकाने श्वास सोडा. असे आठ ते दहा वेळा करा.


  याचे फायदे
  - भूक आणि तहानेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि मन शांत ठेवते.
  - शरीरात शीतलता टिकून राहते.
  - पित्ताची समस्या दूर करण्यास मदत करते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन आसनांविषयी...

 • yogasana for summer information marathi

  2. बद्ध कोनासन
  कसे करावे : दंडासनात बसा. नंतर गुडघे दुमडून पसरवा आणि पायांच्या पंज्यांना चिकटवा. मांड्यांना पसरवा आणि गुडघ्यांना जमिनीवर दाबा. आता पाठीचा कणा सरळ ठेवून सामान्य श्वास घेऊन एक ते पाच मिनिटांपर्यंत थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करा. 


  याचे फायदे 
  - या आसनामुळे बाहेर रखरखीत उन्हाळा असूनही शरीराला गारवा देण्यास मदत करते. 
  - थकवा आणि तणाव दूर करण्यास फायदेशीर आहे. 
  - सायटिका, हर्नियामध्ये लाभदायी आहे. 

 • yogasana for summer information marathi

  3. शवासन 
  कसे करावे : जमिनीवर पाठीवर एकदम सरळ झाेपा. दोन्ही हातांना आपल्या शरीराला एक ते दीड फुटाच्या अंतरावर ठेवा. पंज्यांना वरच्या बाजूला ठेवा आणि बोटांना थोडे वाकवा. दोन्ही पायांना सरळ ठेवून दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि शांत पडून राहा. दोन्ही डोळे बंद ठेवा आणि डोके आणि पाठीच्या कण्याला एकदम सरळ ठेवा. डोक्यात कोणतेही विचार न आणता डोळे बंद करा. या मुद्रेचा ३ ते ५ मिनिटांपर्यंत सराव करा आणि आरामाचा अनुभव घ्या. 


  याचे फायदे 
  - यामुळे उष्णतेतही गारव्याचा अनुभव मिळतो. 
  - यामुळे नसांना आराम मिळतो आणि ऑक्सिजन संूपर्ण रक्तामध्ये पसरतो. ज्यामुळे शरीरात गारवा टिकून राहतो. 
  - यामुळे तणाव दूर करण्यासही मदत होते. 

 • yogasana for summer information marathi

  4. शीतकारी प्राणायाम 
  प्रथम संपूर्ण शरीराला सैल ठेवा. नंतर डोके, घसा आणि पाठीच्या कण्याला एका स्थितीत ठेवा आणि आरामात बसा. शीतकारीमध्ये दातांवर दात ठेवून श्वास घ्या. काही वेळ श्वास आत रोखून ठेवल्यानंतर ओठ बंद करून नाकाने श्वास सोडून द्या. ८ ते १० वेळा करा. 

  कधी करू नका 
  - अस्थमाचे रुग्ण. 
  - सर्दी-पडसे असल्यास. 
  - रक्तदाब कमी असल्यावर 
  विशेष : शीतली आणि शीतकारी प्राणायाम जेवणाच्या दोन तासांनंतर करावा. 

Trending