Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yogasana for winter

हिवाळ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी करा हे योगासन

हेल्थ डेस्क | Update - Jan 11, 2019, 02:17 PM IST

हिवाळ्यात ऊर्जेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी योगासन फायदेशीर आहे. हे दररोज केल्यास प्रत

 • yogasana for winter

  हिवाळ्यात ऊर्जेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि रक्तप्रवाह चांगला करण्यासाठी योगासन फायदेशीर आहे. हे दररोज केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. सोबतच पचनक्रियाही सुधारते आणि आजारांपासून बचाव होतो.


  पर्वतासन
  कसे करावे :
  उजव्या पायाला सरळ करून डाव्या पायाजवळ ठेवा. शरीराला हातावर संतुलित करा. आता कंबरेच्या भागाला जास्तीत जास्त वरच्या बाजूला उचला. डोके दोन्ही हातांमध्ये आणा. हातांना सरळ ठेवा आणि टाचा जमिनीला टेकवा. कंबरेला वर उचलत हळूहळू श्वास सोडा.
  फायदा-
  1. रक्तप्रवाहामध्ये वाढ होते.
  2. दृष्टी चांगली होते.
  3. शरीराची लवचिकता वाढते.


  सुप्त वज्रासन
  कसे करावे
  : वज्रासनात बसताना लक्षात ठेवा की, गुडघे आणि बोटे एकमेकाला चिकटलेली असावी. हळूहळू हाताला मागे घेऊन जमिनीला टेकवा. मान वर उचला आणि दीर्घ श्वास घ्या.
  लाभ-
  1. छातीला फुगवून शरीरात ऑक्सिजन वाढवते.
  2. बद्धकोष्ठता दूर करते.
  3. मेरुदंडाला फायदा होतो.


  उष्ट्रासन
  कसे करावे
  : गुडघ्यावर उभे राहा. आता मागच्या बाजूला वाकून हाताने टाचांना पकडण्याचा प्रयत्न करा. डोके आणि पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त मागे वाकवा. १०-१५ मिनिटे याच स्थितीत राहा.
  फायदा-
  1. दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्तम आसन आहे.
  2. मधुमेहाला ठीक करते.
  3. फुफ्फुस मजबूत होते.

 • yogasana for winter

  सुप्त वज्रासन 
  कसे करावे : वज्रासनात बसताना लक्षात ठेवा की, गुडघे आणि बोटे एकमेकाला चिकटलेली असावी. हळूहळू हाताला मागे घेऊन जमिनीला टेकवा. मान वर उचला आणि दीर्घ श्वास घ्या. 
  लाभ- 
  1. छातीला फुगवून शरीरात ऑक्सिजन वाढवते. 
  2. बद्धकोष्ठता दूर करते. 
  3. मेरुदंडाला फायदा होतो. 

 • yogasana for winter

  उष्ट्रासन 
  कसे करावे : गुडघ्यावर उभे राहा. आता मागच्या बाजूला वाकून हाताने टाचांना पकडण्याचा प्रयत्न करा. डोके आणि पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त मागे वाकवा. १०-१५ मिनिटे याच स्थितीत राहा. 
  फायदा- 
  1. दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्तम आसन आहे. 
  2. मधुमेहाला ठीक करते. 
  3. फुफ्फुस मजबूत होते. 

Trending