आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज सर्वांगासन करा थायरॉइडला दूर सारा 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थायरॉइड ग्रंथी मानेतील श्वासनलिकेच्या वर आणि स्वरयंत्राच्या दोन्ही बाजूंना दोन भागांमध्ये दिसून येतात. थॉयरॉइड ग्रंथी योग्य प्रकारे काम करत नसतील तर रक्तात थायरॉक्सिन नावाच्या हार्मोन्सच्या स्तरावर परिणाम करतो. या त्रासामध्ये ही तीन योगासने केल्यास आजारात मदत होऊ शकते. 


1. सर्वांगासन 
जमिनीवर अासनावर शांत झोपा. श्वास बाहेर सोडून कमरेपर्यंतचे दोन्ही पाय सरळ आणि एकमेकांना चिकटलेल्या स्थितीत वर उचला. नंतर पाठीचा भागही वर उचला. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या. हाताचे कोपरे जमिनीला चिकटलेले असावेत. मान आणि खांद्यांच्या बळावर संपूर्ण शरीर वर सरळ ताठ उचला. हनुवटी छातीस लावलेली असावी. दोन्ही पाय आकाशाकडे असावेत. दृष्टी दोन्ही पायांच्या अंगठ्यावर किंवा डोळे मिटून श्वास दीर्घ स्वाभाविक चालू द्या. या आसनाचा अभ्यास दृढ झाल्यानंतर दोन्ही पायांना पुढे-मागे झुकवत जमिनीला लावून अन्य आसनेसुद्धा करू शकता. सुरुवातीला तीन ते पाच मिनिटे हे आसन करावे. अभ्यासक तीन तासांपर्यंत या आसनाचा वेळ वाढवू शकतात. 


फायदे 
- वजन नियंत्रित करते. 
- केसगळती थांबते. 
- सुरकुत्या, मुरूम आिण वाढणाऱ्या वयाचा परिणाम कमी करते. 


2. मत्स्यासन 
जमिनीवर मांडी घालून बसा. हळूहळू मागे वाका आिण पूर्णपणे पाठीवर झोपा. आता डाव्या पायाला उजव्या हाताने धरा आिण उजव्या पायाला डाव्या हाताने धरा. कोपरांना जमिनीवर टेकवा.या दरम्यान गुडघे जमिनीला टेकलेले असावे. श्वास घेऊन डोक्याला मागच्या बाजूला वाकवा. तुम्ही हाताच्या साहाय्यानेही तुमच्या डोक्याला मानेकडे वाकवू शकता. या अवस्थेला स्वत:च्या हिशेबाने करा. नंतर दीर्घ श्वास सोडून पुन्हा पूर्ववत अवस्थेत या. हे एक चक्र आहे. या प्रकारे तीन ते पाच चक्रे करा. 


फायदे 
- थायरॉक्सिन हार्मोन स्रावासाठी मदत करते. 
- बद्धकोष्ठतेच्या उपचारासाठी फायदेशीर आहे. 
- लैंगिक विकारांपासून बचावण्यास परिणामकारक आहे 


3. उष्ट्रासन 
प्रथम वज्रासनामध्ये बसावं. आता गुडघ्यावर उभं राहावं आणि दोन्ही पायांमध्ये साधारणत: दहा ते पंधरा संे.मी. इतकं अंतर ठेवावं. सुरुवातीला मागील पाय काही सेकंद हे पायांच्या बोटावर असावेत. दोन्ही हात स्वीमिंग करतो तसे मागच्या दिशेने फिरवावे आणि मग हळुवारपणे उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडावी आणि डाव्या हाताने डाव्या पायाची टाच पकडावी. मानेला मागे न्यावे. या स्थितीत सुरुवातीला दहा सेकंद राहावं. या स्थितीत असताना शरीराचा आकार इंग्रजी अक्षर यूप्रमाणे दिसतो. आता हळुवारपणे हात सोडून पूर्वस्थितीत यावं. पूर्वस्थितीत येताना घाई करू नये. वज्रासनावरून गुडघ्यावर उभे राहताना श्वास घ्यावा. मागे जाताना श्वास सोडावा. आसनस्थितीत नियमित श्वासोच्छ्वास असावा. असे एक चक्र पूर्ण करा याप्रकारे पाच ते सात वेळा करू शकता. 


फायदे 
- क्रोध दूर करण्यास मदत होते. 
- स्नायूमध्ये रक्तप्रवाह वाढण्यास मदत करते.
- थायरॉइड शिवाय मधुमेहासाठीही फायदेशीर आहे.