आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी फायदेशीर आहे हे योगासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नौकासन पोटावर केले जाणाऱ्या आसनांपैकी एक महत्त्वपूर्ण योगासन आहे. या आसनात शरीराचा आकार नावेसारखा होतो म्हणून या आसनाला नौकासन म्हटले जाते. 

  • कसे करावे

आसनस्थिती - विपरीत शयनस्थिती, म्हणजेच पोटावर झोपलेली स्थिती * कृती- सर्वप्रथम पोटावर झोपावे, पावले जुळली असावीत. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचे बॅलन्स पोटावर आले पाहिजे..ह्या स्थितीत थोडे थांबावे. आणि सावकाश आसन सोडावे 

  • याचे फायदे

वजन : यामुळे संपूर्ण शरीराचे वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण करून पाहिजे तसे फिगर मिळवू शकता. 

पाठीचा कणा: पाठीच्या कण्यासाठी हा फायदेशीर आहे. हे पाॅश्चर ठिक करण्यासाठी आणि शरीर संतुलन चांगले करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

किडनी : नियमितपणे या आसनाला केल्यास किडनीचे आजारांपासून बचाव होतो. हा शरीराच्या प्रत्येक अवयवांसाठी फायदेशाीर याेगा आहे. 

पचनक्रिया: हा योगा तुमच्या पचनक्रियेला मजबूत करते आणि पचनासंबंधीच्या आजारापासून जसे अपचन, गॅस, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. 

  • ही घ्या काळजी

- जेव्हा कंबरेत दुखणे असेल तेव्हा हे आसन करू नये.  - पाठीच्या दुखण्याची समस्या असेल त्यांनी हे करू नये. 

बातम्या आणखी आहेत...