Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | yogasana tips for constipation acidity

बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडिटीत फायदेशीर आहेत हे तीन योगासन

हेल्थ डेस्क | Update - Feb 06, 2019, 12:04 AM IST

बद्धकोष्ठता, गॅस आणि मधुमेआसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो. 

 • yogasana tips for constipation acidity

  जर पोटात दुखत असेल किंवा अॅसिडिटीने त्रस्त आहात तर ही तीन योगासने अवश्य करा. तुम्हाला लगेच आराम मिळेल. हे करण्याची पद्धतही सोपी आहे. तर मग आजपासून सुरू करा.


  पवनमुक्तासन
  असे करा

  पाठीवर झाेपा. दोन्ही पाय पसरा आणि यामधील अंतर कमी करा. अाता दोन्ही पाय उचला आणि गुडघे दुमडा. नंतर गुडघ्यांना हातांनी धरा. श्वास घ्या आणि सोडा. गुडघ्यांना छातीजवळ आणा. डोके उचला किंवा गुडघ्यांना छातीजवळ आणा, ज्यामुळे हनवुटीचा गुडघ्यांना स्पर्श होईल. नंतर श्वास घेत पायांना जमिनीवर टेकवा. असे ३ ते ५ वेळा करा.


  फायदा
  बद्धकोष्ठता, गॅस आणि मधुमेआसाठी फायदेशीर आहे. पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत होते. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन आसनांविषयी...

 • yogasana tips for constipation acidity

  मंडुकासन 
  असे करा 

  वज्रासनाच्या स्थितीत बसून हाताच्या मुठी बांधून नाभीजवळ घेऊन जा. मुठीला नाभी आणि मांडीजवळ अशा तऱ्हेने ठेवा की, मूठ उभी राहील आणि बोटं पोटाच्या िदशेने असतील. आता श्वास सोडून पुढे वाका आणि छातीला अशा प्रकारे खाली आणा की ते मांडीला टेकतील. अशा प्रकारे पुढे वाका की, नाभीवर जास्त दबाव येईल. आता डोके आणि मान वर करा, नजर सरळ ठेवा. हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. या स्थितीत शक्य असेल तेवढा वेळ राहा. श्वास घेऊन पूर्वस्थितीत या आणि थांबा. असे ३ ते ५ वेळा करा. 


  फायदा 
  बद्धकोष्ठता,गॅस आणि अॅसिडिटीमध्ये फायदा होतो. गुडघे लवचिक आणि मजबूत होतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. 

 • yogasana tips for constipation acidity

  धनुरासन 
  असे करा 

  पोटावर झोपा. दोन्ही गुडघ्यांना दुमडून टाचांना नितंबावर टेकवा. आता हातांनी पायाच्या पंज्यांना पकडा. शक्य असेल तेवढे मांड्या आणि छातीला वर उचला. १५-२० सेकंद याच मुद्रेत राहा. असे ५ ते ७ वेळा करा. 


  फायदा 
  पचनक्रिया चांगली राहते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे संपूर्ण शरीराला आॅक्सिजनयुक्त रक्त मिळते. प्रजनन तंत्रही चांगले राहते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते तसेच लठ्ठपणा कमी करण्यासही मदत होते.

Trending