आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजीलॉकर कसं आणि का वापरावं...?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रा. योगेश हांडगे महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया प्रकल्पांतर्गत डिजीलॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलीय. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे आता एका क्लिकवर तुम्हाला मोबाइलवर उपलब्ध होऊ शकतात. ही सुविधा इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत पुरवण्यात आली आहे.   डीजीलॉकर ही क्लाउडबेस आधारित प्लॅटफॉर्म सुविधा आहे. नागरिकांची  महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहावीत हा या लॉकरचा मुख्य उद्देश. या लॉकरमध्ये नागरिकांना कागदपत्रांच्या सॉफ्टकॉपी ठेवता येतात. आवश्यकतेनुसार त्या कॉपीची प्रिंट काढता येते. गुगल प्लेस्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करता येते. तसेच digilocker.gov.in या संकेतस्थळावरून डिजीलॉकर ॲप डाऊनलोड करू शकता. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर आधार नंबर आणि मोबाइल नंबरवरून रजिस्टर करुन  वनटाइम पासवर्ड वापरून डिजीलॉकरमध्ये प्रवेश करुन त्याचा पासवर्ड सेट करता येतो.  आधार तसंच पॅन कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स, शैक्षणिक कागदपत्रे, व्यक्तिगत कागदपत्रे, मतदान आणि विद्यापीठ ओळखपत्रं-प्रमाणपत्रं.  यासाठी ही सुविधा वापरता येते. अशी महत्त्वाची कागदपत्रे आधार कार्ड क्रमांकाना जोडण्याची सुविधाही यामधे उपलब्ध आहे.  गरज असेल तेथे डिजिटल स्वाक्षरी केलेली कागदपत्रे साठवण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. डिजीलॉकरमध्ये प्रत्येक नागरिकाला 10 MB जागा उपलब्ध करण्यात आली होती; परंतु नंतर ती वाढवून स्वतंत्रपणे १ गीगाबाइट एवढी माहिती साठवण्याची सुविधा देण्यात आली आहे.     > गुगल प्लेस्टोअरमधूनही हे ॲप डाऊनलोड करता येते तसेच  https://digilocker.gov.in/ या संकेतस्थळावरून तुम्ही डिजीलॉकर ॲप डाऊनलोड करू शकता.  > Sign Up वर क्लिक करावे. > येथे मोबाइल क्रमांकाची विचारणा करण्यात येईल. तेथे तुमचा  मोबाइल क्रमांक नोंदवावा  > त्यानंतर तुमच्या  मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे एक वनटाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. तो कोड ॲप स्क्रीनवर टाइप करावा लागेल  > नवीन खाते तयार करण्यासाठी  माहिती विचारण्यात येईल, ती माहिती टाइप करावी आणि त्यानंतर आधार क्रमांक नोंदवा.  > यानंतर आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइल क्रमांकावर एक वनटाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल. तो कोड टाइप करा. > वरील क्रिया पूर्ण झाल्यावर नागरिकास 6 अंकी पिन क्रमांक तयार करावा लागतो. हा पिन क्रमांक कायमस्वरूपी असतो > यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे डिजीलॉकर ॲपवरील लिंकवरून डाऊनलोड  तसेच तुमची इतर कागदपत्रे अपलोड करून साठवता येतील. हवे तेथून हाताळता येतील किंवा हवे तेव्हा नवीन कागदपत्रे अपलोडही करता येतील.डिजीलॉकरमधील डॉक्युमेंट्स फक्त PDF, JPEG, PNG, BMP किंवा GIF या मध्येच अपलोड करावी लागतात.

डिजीलॉकर सुविधेचे फायदे 
डिजी ई – लॉकरमुळे कधीही कुठेही महत्त्वाची कागदपत्रं हवी असल्यास त्या वेळी फक्त आधार नंबरवरून मिळवता येतात. सरकारने जवळपास सर्व ठिकाणी डिजीलॉकरमधले सर्टिफिकेट स्वीकारण्यासाठी आदेश दिले आहेत. रस्त्यावर आरटीओ अधिकाऱ्यांकडून वाहन तपासणी करताना वाहनचालकांकडून वाहनाची कागदपत्रे तपासणीसाठी मागितली जातात. अशा वेळी वाहनमालक आणि चालकांकडे डिजी लॉकर अॅपमध्ये वाहनाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये उपलब्ध असल्यास ती ग्राह्य धरली जातात.

(लेखक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. )

लेखकाचा संपर्क : ९४२३०७७९६३

बातम्या आणखी आहेत...