आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणचा 'तान्हाजी' उत्तरप्रदेशातही टॅक्स-फ्री, योगी सरकारचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - छत्रपती शिवाजी महारांचे परममित्र आणि मराठा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत 'तान्हाजी-द अनसंग वॉरियर' चित्रपट उत्तर प्रदेशात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटाचे सह-निर्माता आणि अभिनेता अजय देवगण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशात चित्रपट कर मुक्त करण्याची विनंती केली होती.योगी सरकारने यामुळे घेतला तान्हाजी टॅक्स-फ्री करण्याचा निर्णय 

तानाजींचा पराक्रम आणि त्यागपूर्ण जीवनातून प्रेरणा मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असल्याची उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे.  

महाराष्ट्रातही चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी 


महाराष्ट्र भाजपानेही हा चित्रपट करमुक्त करावा अशी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मित्र होते. 1670 च्या सिंहगडाच्या लढाईसाठी त्यांना आठवले जाते. या लढाईत ते मुघलांचा किल्लेदार उदयभान राठोडसोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि मराठ्यांना विजय मिळवून दिला. 
 

बातम्या आणखी आहेत...