आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yogi Government Imposed New Rule On Liquor And Toll For Cow Protection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारू प्यायल्यावर गायीला करावे लागेल दान, योगी सरकारचा नवा आदेश...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गायींच्या सुरक्षेसाठी नेहमी योगी सरकारकडून वक्तव्य केले जातात. त्यातच आता योगी सरकारने गायींच्या सुरक्षेसाठी नवीन योजना आणली आहे. या योजने अंतर्गत योगी सरकार राज्यातील सगळ्या गावात गोशाळा उघडणार आहे. या प्रस्तावाला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे. नवीन प्रस्तवानुसार, गायींच्या सरंक्षणासाठी राज्यात दारू आणि टोल नाक्यावर जास्तीचा 0.5 टक्के कर लावणार आहेत. त्याशिवाय उत्पादन करावर 2 टक्के जास्तीचा कर लावण्यात येईल. 

 
गायींयी तस्करी थांबवण्यास मदत मिळेल
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षेतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याची मंजुरी मिळाली. सरकारचे प्रवक्ते आणि ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांनी सांगितले की, सरकारने प्रत्येक गावात तात्पुरती गोशाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच भटक्या जनावरांसाठीही चांगली व्यवस्था करण्याचा विचार करत आहे. सरकारची योजना आहे की, गायींची तस्करी बंद व्हावी आणि भटक्या जनावरांना निवारा मिळावा.

 

ग्राम पंचायतीत बनणार  गोशाळा
ग्राम पंचायत स्तरावर सरकारी जमीन उपलब्ध झाल्यावर गोशाळा बांधण्यात येतील. त्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून ग्राम पंचायत, आमदार आणि खासदार निधीतून पैशांची व्यवस्था करण्यात येईल. सरकारने यासाठी स्थानीक संस्थांना 100 कोटींचा निधी मंजुर केला आहे. जिल्ह्यात आणि गावात अंदाजे 1000 जनावरांची राहण्याची व्यवस्था होईल इतकी मोठी गोशाळा बांधण्यात येईल. त्याशिवाय इतर विभागात जमा झालेल्या करातून 0.5 टक्के गोशाळेला दिले जातील. त्याशिवाय मंडई परिषदेतूनही 0.5 टक्के घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, कोणत्याही प्रकारे राज्यात गोहत्या थांबली पाहिजे. 


पशुसंवर्धन मंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी राज्यातील सगळ्या गावात तातपुरत्या गोशाळा बांधण्यात येतील. याचे निर्माण खेड्यात ग्राम पंचायतकडून करण्यात येईल तर शहरात स्थानीक संस्थाकडून करण्यात येईल. त्यांनी सांगितले की यासाठी पैशांची कसल्याही प्रकराची कमतरता भासणार नाही. 8 विभाग यासाठी पैशांची व्यवस्था करतील. यासाठी प्रत्येक जिल्हाला निधी उपलब्ध करण्यात आला आहे.


अपघात होईल कमी

बघेल यांनी यांनी सांगितले की, भटकी जनावरे गाव तसेच शहरासाठी मोठी समस्या आङेत, यामुळे अपघात आणि शेतीला नुकसान होते. त्या भटक्या जनावरांच्या सुरक्षेसाठी निवारे बांधण्यात येतील, आणि चे सगळे निवारे सरकारी जमीनींवर होतील. शहरातील संस्थांना जनावरे ठेवण्यासाठी प्रत्येक जनावरामागे 30 रूपये मिळतील. प्रत्येक गावात अंदाजे 1000 जनावरांना अश्रय मिळेल.