आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: दारव्हा मार्गावर भोयर शिवारात प्रेमीयुगुलाची आत्महत्या, चार दिवसांपासून होते बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- शहरातील दारव्हा मार्गावर असलेल्या भोयर शिवारातील गिट्टी खदानीजवळ प्रेमीयुगुलाने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.6) सकाळी समोर आली. दीपक जाधव (वय-21, रा. कमलेश्वर मंदिर, परिसर, लोहारा) या तरुणाचा मृतांमध्ये समावेश आहे. मृत मुलगी ही अल्पवयीन असून तिचे नाव गोपनिय ठेवण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.3) अल्पवयीन मुलगी ग्रंथालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत ती घरी न आल्याने तिच्या नातेवाईकांनी तिची सर्वत्र शोध घेतला. परंतु ती आढळून आली नाही. नंतर सोमवारी (ता.4) मुलीच्या नातेवाईकांनी लोहारा पोलिस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दीपक हा देखील बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी मंगळवारी (ता.5) लोहारा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली.

 

गिट्टी खदानीजवळ आढळली दुचाकी आणि कॉलेज बॅग

लोहारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दारव्हा मार्गावरील भोयर शिवारात असलेतील पेट्रोलपंपच्या मागील गिट्टी खदानीजवळ एक दुचाकी आणि कॉलेज बॅग आढळून आली. परिसरातील नागरिकांनी ही माहिती लोहारा पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान, त्या परिसरातील काही अंतरावर पाण्यानी भरून असलेल्या खड्डयात नागरिकांनी उडी घेऊन पाहणी केली, परंतु काहीही आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी आणि बॅग ताब्यात घेऊन पुढील तपासास सुरुवात केली. तपासादरम्यान साेपडलेली बॅग आणि दुचाकी दीपकची असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मुलीचा मृतदेह दारव्हा मार्गावर असलेले भोयर शिवारातील गिट्टी खदानीजवळी एका खड्‍ड्यात पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पासरली. उपविभागीय अधिकारी पीयुष जगताप, लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनोने, आदींसह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काही नागरिकांच्या मदतीने त्या मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. दरम्यान, काही नागरिकांना पाण्यातून बुडबुडे बाहेर निघताना दिसले. त्यावरून संशय बळावला. शोधमोहीम सुरू करण्यात आली. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर आढळून आला.

 

प्रेमप्रकरणातून आत्महत्या..

प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. घटनेचे संबंधित फोटो

बातम्या आणखी आहेत...