Home | Business | Industries | You can earn more than 2 Lakh rupee per month by taking this franchise

या कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये! अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 18, 2019, 12:03 AM IST

6 महिन्यांत केलेल्या गुंतवणुकीची 50 टक्के रक्कम वसूल होईल असा कंपनीचा दावा आहे.

 • You can earn more than 2 Lakh rupee per month by taking this franchise

  युटिलिटी डेस्क - स्वतःचा उद्योग किंवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायद्याची ठरू शकते. प्रतिष्ठित कंपनीसोबत फ्रेंचायझी ओपन करून आपणही दरमहा लाखो रुपयांची कमाई करू शकता. आम्ही आज आपल्याला अशाच एका कंपनीबद्दल सांगत आहोत. काही नियम आणि अटींचे पालन करून या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला दरमहा 2 लाख रुपयांपर्यंत इनकम मिळू शकते.


  Big Mart देत आहे फ्रेंचायझी घेण्याची संधी
  फूड आणि ग्रॉसरी उद्योग करणारी कंपनी Big Mart Retail देशभरात लोकांना आपल्या कंपनीची फ्रेंचायझी देत आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर यासंदर्भात माहिती जारी केली. त्यानुसार, देशातील कुठलीही व्यक्ती याचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करू शकते. यात सिंगल युनिट फ्रेंचायझी आणि मास्टर फ्रेंचायझी असे दोन पर्याय दिले जात आहेत. कंपनीचा दावा आहे की अशा प्रकारे उद्योग करून 2 लाख रुपये मासिक कमाई होईल.


  करावी लागेल एवढी गुंतवणूक
  कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सिंगल युनिट फ्रेंचायझी मिळवण्यासाठी 50 ते 10 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे. फ्रेंचायझीचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे 300 ते 30,000 चौरस फुट जागा असावी. एकदा गुंतवणूक केल्यास 6 महिन्यात आपल्या गुंतवणुकीची 50 टक्के रक्कम परत मिळवता येईल असा कंपनीचा दावा आहे. या सर्व गोष्टी विक्रीवर अवलंबून असतील. बिग मार्ट रीटेल आपल्याला प्रत्येक प्रॉडक्टच्या विक्रीवर 5 ते 50 टक्के पर्यंत रॉयल्टी देत आहे. या व्यतिरिक्त मास्टर फ्रेंचायझी उघडण्यासाठी आपल्याला 20 ते 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे.

  पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी सविस्तर माहिती...

 • You can earn more than 2 Lakh rupee per month by taking this franchise

  या साहित्यांची केली जाते विक्री
  Big Mart Retail दैनंदिन गरजेच्या वस्तूंची विक्री करते. यामध्ये किराणा, कॅन्डी, पर्सनल केअर प्रॉडक्ट, सॉफ्ट ड्रिंक, रेडी टू इट फूड, आइसक्रीम, मॅगझीन इत्यादींचा समावेश आहे. कंपनी शॉप फ्रॉम होम आणि आउटलेट स्टोरवरून सुद्धा खरेदी करण्याचे पर्याय ग्राहकांना देते. सद्यस्थितीला या कंपनीची 90 दुकाने आहेत. बिग मार्ट रीटेलचे अधिकारी शरद मिश्रा सांगतात, की कंपनी पहिल्यांदा 5 वर्षांची फ्रेंचायझी देते. स्टोअर सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून कमाई सुरू होते.

 • You can earn more than 2 Lakh rupee per month by taking this franchise

  फ्रेंचायझी घेण्यासाठी या वेबसाइटवर करा अर्ज
  आपणही या कंपनीची फ्रेंचायझी घेऊ इच्छित असाल तर https://www.bigmartretail.com या वेबसाइटला भेट देऊ शकता. यावर संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सोबतच, याच संकेतस्थळावरून आपल्याला अर्ज सुद्धा करता येईल. कंपनी आपल्याला सेल्स अॅन्ड मार्केटिंग, टेक्नीकल आणि ऑपरेशनल सपोर्ट सुद्धा देत आहे.

Trending