आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडेही अडीच रूपयांची 'ही' नोट असेल तर मिळतील 7 लाख रूपये, जाणून घ्या काय आहे या नोटेत इतके खास...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही 1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 1000 आणि 2000 रूपयांची नोट पाहिली असेल, पण तुम्ही कधी अडीच रूपयांच्या नोटेबद्दल ऐकले आहे का? हो, तुम्ही बरोबर वाचले आहे, भारतात कधी-काळी अडीच रूपयांची नोट चालायची. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ही नोट कधी चलनात होती आणि काय खास आहे या नोटेत.

 

22 जानेवारी 1918 ला चलनात आली होती नोट
भारता स्वतंत्र्याच्या आधी 22 जानेवारी 1918 ला अडीच रूपयांची नोट चलनात आली होती. येणाऱ्या 22 जानेवारीला ही नोट पूर्ण 101 वर्षांची होणार आहे. ही नोट 1 जानेवारी 1926 पर्यंत म्हणजे पूर्ण 8 वर्षे चलनात होती. अडीच रूपयांच्या या नोटेला खुप दुर्मिळ मानले जाते. हेच कारण आहे की, अडीच रूपयांच्या या नोटेची सध्या किंमत 7 लाख रूपये आहे.


ही आहे खास बाब
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नोटेची साईज 12 गुणीले 17 सेंटीमीटर होती. या नोटेला हँडमेट पेपरवर ब्रिटेनमध्ये प्रिंट केले होते. या नोटेवर ब्रिटेनचे तत्कालीन आर्थिक सचिवाचे हस्ताक्षर होते. नोटेवर जॉर्ज व्ही. चा अष्टकोणीय फोटो होती. या नोटेवर एका बाजुला 2 रूपये आणि आठ आणा लिहीले होते. ब्रिटीशांच्या काळात एका रूपयात 16 आणे होते, त्यामुळेच या नोटेवर 2 रूपये आणि 8 आणा लिहीले होते.


रंगून आणि म्यांमारमध्येही चालायची ही नोट
ब्रिटिश राजमध्ये ही नोट सात सर्कलमध्ये चालायची. यांत कानपूर, बॉम्बे, कलकत्ता, कराची, लाहौर, मद्रास आणि रंगून सामिल होते. त्यावेळस रंगून आणि म्यांमारदेखील ब्रिटिशांच्या ताब्यात होते. नोटेवर आठ भाषेत अडीच रूपये लिहीले होते. त्यात उर्दू, बांग्ला, गुजराती, ओडिया आणि दक्षिणाच्या भाषेच्या समावेश होतै. महत्तवाची बाब म्हणजे या नोटेवर हिंदी भाषा नव्हती. 

 

पुढील स्लाइडवर पाहा नोटेची काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...