आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क - भारतीय स्टेट बँक (SBI) ने आपल्या ग्राहंकासाठी खास ऑफर आणली आहे. बँकेकडून सांगण्यात आले आहे, की जर ग्राहकांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) च्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरले आणि BHIM अॅपवरून पेमेंट कली, तर त्यांना 5 लिटर पेट्रोल फ्री दिले जाईल. या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांना किमान 100 रुपयांचे पेट्रोल टाकावे लागेल.
पेमेंट डिटेल्स करावे लागेल एसएमएस
यासाठी ग्राहकांना किमान 100 रुपयांचे पेट्रोल टाकावे लागेल. याचे पेमेंट कॅशमध्ये न करता BHIM अॅपने करावी लागेल. त्यानंतर 12 डिझिट ट्रांझॅक्शन नंबर आणि त्यादिवशीची तारीख 9222222084 या नंबरवर एसएमएस करावी लागेल. या फ्री ऑफरबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ग्राहक 1800228888 या टोल फ्री नंबरवर सुद्धा फोन करू शकतात.
एका मोबाइल नंबर वर जास्तीत जास्त 2 वेळा मिळवू शकता ऑफर
याव्यतिरिक्त ग्राहक help@xtrarewards.com यावर मेल पाठवून मदत घेउ शकतात. या ऑफर अंतर्गत दर रोज 10 हजार लकी कस्टमर्सना 5 लीटर पर्यंत पेट्रोल फ्री मिळु शकेल. ही ऑफर 23 डिसेंबर रात्री 12 पर्यंतच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.