Home | Business | Personal Finance | You can make 1 crore rupee fund by investing 5000 rupee per month in mutual fund

टिप्स/ दर महिना 5 हजार रूपयांची गुंतवणूक करून व्हा कोट्याधीश

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 06, 2019, 03:18 PM IST

म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करून भविष्यासाठी तयार करा मोठा फंड

 • You can make 1 crore rupee fund by investing 5000 rupee per month in mutual fund

  नवी दिल्ली- प्रत्येक व्यक्ती आज आपल्या भविष्यातील गरजांची पुर्तता करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. म्हणून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे असते, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुटूंबाच्या खर्चानुसार चांगला रिटर्न मिळू शकेल. फिक्स्ड डिपॉझीट, मुदत ठेवी गुंतवणूकीसाठी चांगले पर्याय आहेत पण त्याचा रिटर्न दर कमी आहे. अधिक गुंतवणूकीसाठी म्यूच्युअल फंड चागला पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करून 1 कोटी रूपयांचा फंड बनवण्याचा मार्ग सांगणार आहोत.


  म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे योग्य माध्यम
  सध्या 'म्यूच्युअल फंड' गुंतवणूकीसाठी अतिशय चांगले माध्यम म्हणून पुढे येत आहे. यात मिळणारा परतावा गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. यामुळे म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. दिर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथे आपल्याला चांगला रिटर्न मिळतो. या फंडमध्ये गुंतवणूकीवर सरासरी 14 टक्के रिटर्न मिळतो. म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखिमांवर अवलंबून असते, म्हणून गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


  5 हजार महिन्याला गुंतवणूक करणार कोट्याधीश
  तज्ज्ञानुसार, जर आपण भविष्यात मोठा फंड तयार करायचा असेल तर म्युच्युअल फंडामध्ये 5000 रूपये महिन्याला गुंतवणूक करून सुरूवात करू शकता. ही रक्कम दरवर्षी महिन्याच्या आधारे 15 टक्कयांनी वाढवा. तज्ज्ञानुसार गुंतवणूक करते वेळी धैर्य ठेवा आणि गुंतवणूकीवर लक्ष ठेवा. या स्टेप्स फॉलो करून गुंतवणूक केली तर आपण सरासरी 14 टक्क्यांनी जवळपास 18 वर्षांनी एक कोटी रूपयांच्या मालक व्हाल.


  अशी वाढेल गुंतवणूक
  जर आपण महिन्याला 5000 रूपये गुंतवणूक करत असाल आणि महिन्याच्या आधारे दरवर्षी 15 टक्क्यांची वाठ करतात तर 5 वर्षांमध्ये आपल्या खात्यात 5 लाख 53 हजार रूपये जमा होतील. अशा प्रकारे सतत गुंतवणूक आणि रिटर्नमुळे आपल्या खात्यात 10 वर्षांमध्ये 21 लाख रूपये जमा होतील. 15 वर्षांत आपल्या खात्यात 64 लाख रूपये जमा होतील. 17.5 वर्षांमध्ये जमा आणि रिटर्नमुळे आपण 1 कोटी रूपये आपल्या खात्यात जमा होतील.

Trending