आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे डिस्कव्हरच्या किमतीत मिळतेय रॉयल इनफिल्डची बुलेट, कधीही या आणि घेऊन जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तसे पाहिले तर आपल्याला रस्त्यावर अनेक कंपन्यांच्या वेगवेगळ्या बाईक्स पाहायला मिळत असतात. त्यात रॉयल इनफिल्डच्या बाइक्स अशा आहेत, ज्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. एक तर ही जुनी कंपनी आहे आणि या गाडीचा लूकही एकदम शाही आहे. पण महागडी असल्याने लोक ही बाइक घेणे टाळतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आज अशा एका जागेबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्हाला ही बाइक डिस्कव्हर किंवा पल्सरच्या किमतीत मिळेल. 


सध्या ऑर्गनाइज्ड यूझ्ड टू व्हीलर मार्केटमध्ये अगदी कमी किमतीत चांगल्या गाड्या खरेदी करता येतात. तसेच या बाइक्सची संपूर्ण सर्व्हीस हिस्ट्रीदेखिल तुम्हाला याठिकाणी कळते. म्हणजे बाइक किती चालली आहे, कितीवेळा सर्व्हीसिंग झाली आहे, अशी माहिती मिळते. तुम्हाला सेकंड हँड बुलेट खरेदी करण्यासाठी फार फिरण्याची गरज नाही. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ती खरेदी करता येईल. 

 

या आहेत वेबसाईट्स
www.droom.in
www.zigwheels.com
www.quikr.com
www.bikedekho.com

या ठिकाणी तुम्ही अशा यूझ्ड बाइक खरेदी करू शकता आणि त्यावर अनेक ऑफरही मिळतात. 

बातम्या आणखी आहेत...