आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटो कुठले आहेत हे कळल्यानंतर तुमचा विश्वासच बसणार नाही..तुम्हालाही बसेल धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईराणचे नाव समोर येताच आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती अत्यंत कडक नियम आणि कायदे असलेल्या कट्टरतावादी इस्लामिक देशाची प्रतिमा. तसे पाहता या प्रतिमेमागे मोठ्या प्रमाणावर ईराण आणि अमेरिकेचे कट्टरपंथी आहेत. त्यांनी इराणची अशी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जी पाश्चिमात्य सभ्यता आणि आधुनिकतेचा विरोध करते. इस्लामिक क्रांतीनंतर ईराणमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल समोर आले आहेत. पण तरीही या देशाचे खरे रुप या राजकीय प्रतिमेपेक्षा बरीच वेगळी आहे. ईराणमध्ये राहणाऱ्या लोकांची जीवनशैली ज्या प्रमाणे कट्टरपंथी भासवतात त्यापेक्षी अगदी वेगळी आहे. 


इतर देशांप्रमाणे गुन्हेगारी आणि हिंसा येथील रोजच्या जीवनातील सत्य आहे. पण इराण हा असा देश आहे जो, कट्टर परंपरावाद आणि आधुनिक संवेदनशीलता यादरम्यान रस्ता काढण्याच्या मागे आहे. या प्रयत्नाचा सर्वाधिक परिणाम ईराणच्या सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी असलेल्या तेहरानमध्ये पाहायला मिळतो.  येथील लोकांचे जीवनमान इतर देशांप्रमाणेच सामान्य आहे. मग तो वेशभुषेचा मुद्दा असो किंवा जीवनशैलीचा. 


महिलांच्या जिमपासून ते हुक्काबार आणि पार्ट्या येथे सहज पाहायला मिळतात. हे फोटो अशा इराणचे रुप सर्वांसमोर मांडतात जे साधारणपणे दाखवले जात नाही. तसेच कोणत्याही देशाबाबतचे मत हे त्याठिकाणची राजकीय स्थिती पाहून तयार होत नसल्याचेही अधोरेखित होते. 


पुढील फोटोजमध्ये पाहा, इराकचे सध्यस्थितीचे एक असे रुप जे आजवर लपलेले होते... 

 

बातम्या आणखी आहेत...