आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनची चार्जिंग करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष, दिर्घकाळ टिकेल फोनची बॅटरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क: आजकल आपण नेहमीच फोनच्या बॅटरीच्या ब्लास्टचे प्रकरण पाहतो. अशा वेळी आपल्या मोबाईल बॅटरीच्या चार्जिंगवर लक्ष ठेवणे गरजेचे असते. फोन चार्जिंगविषयी नेहमी नवनवीन गोष्टी समोर येत असतात. तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल की, फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये. यामुळे बॅटरी आणि फोन खराब होतो. परंतु असे तुमच्यासोबत होत असेल तर घाबरण्याची गरज नाही. स्मार्टफोन आणि बॅटरीचे टेस्ट करणा-या cadax कंपनीने हे सांगितले आहे. या कंपनीने सांगितल्यानुसार, फोन फुल चार्ज झाल्यानंतर चार्जर ऑटोमॅटिकली टर्नऑफ होतो. 

 

अजून कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष 
- बॅटरी यूनिव्हर्सिटीनुसार जर तुम्हाला चांगली बॅटरी लाइफ हवी असेल तर तुम्ही थोडा-थोड्या वेळात फोन चार्ज करावा. 10 टक्के किंवा 20 टक्के चार्ज केल्याने फोनच्या बॅटरीला कोणतेही नुकसान होत नाही. 
- तुम्हाला बॅटरी लाइफ कमी करायची नसेल तर बॅटरी रेड झोनमध्ये जाऊ देऊ नका. जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये 15% हा रेड झोन असतो.
- म्हणजे फोनची बॅटरी 15 टक्के झाल्यावर फोन चार्जिंगला लावा. बॅटरी 65 ते 75 टक्के ठेवण्याचा प्रयत्न करा. 
- जर तुम्ही फोन फ्रिक्वेंटली चार्ज करु शकत नसाल तर पावरबँक तुमच्यासोबत ठेवा. 
- फोन वारंवार 100 टक्के चार्ज करु नका. 95 टक्के चार्ज करणे ठिक राहते.
 

बातम्या आणखी आहेत...