आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची ‘मिठाई आणि सफाई’ तुम्हीच सांभाळा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी मी मुंबईतील मंत्रालयात एका मंत्र्यांच्या चहाच्या आमंत्रणावरून गेलो. पण तिथे चहा प्यायला नम्रपणे नकार दिला. कारण तिथला चहा म्हणजे जणू “खीर’ असते, इतकी साखर त्यात घालतात. पण मंत्रिमहोदयांनी आग्रह केल्यामुळे मी तो घेतला. पण चहा खरेच कमी साखरेचा होता. येथे सहा हजार लोक काम करतात आणि कँटीनमध्ये रोज कमीत कमी १० हजार कप चहा तयार होतो. इतके दिवस दरमहा १९०० किलो साखर लागत असे, आता हे प्रमाण कमी होऊन १४०० किलो झाले आहे. खराब जीवनशैलीचे परिणाम काय होतात हे येथील लोकांना कळाले असावे म्हणूनच हे साखरेचे प्रमाण कमी झाले असावे. आहार नियमनाचे दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास बंगळुरूच्या कॉर्पोरेट ऑफिसचे घेता येईल. येथील कर्मचारी हे जाणून घेऊ शकतात की, ते कँटीनमध्ये जे खातात त्यात कॅलरीचे प्रमाण किती आहे. यासाठी एक डिजिटल यंत्रणा लावण्यात आली असून तुम्ही तुमच्या जेवणात एक गुलाबजामून वाढवला तर १५० कॅलरी वाढल्याची अक्षरे समोरच्या स्क्रीनवर चमकतात. कंपनीने तसे किती खावे यावर काही बंधन घातले नाही, पण लंचमध्ये कर्मचाऱ्याने ५०० कॅलरीपेक्षा जास्त अन्न घेऊ नये याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न चांगलाच म्हणावा लागेल. गुरुग्राममध्ये मिन्त्रा कंपनीमधील कर्मचारी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असून मॅनेजमेंटही त्यांना साथ देते. हळूहळू, सलाड, ज्यूस, कमी कॅलरी व कमी मीठ व तेलात बनवलेले अन्न नव्या पिढीच्या सवयी बनत आहेत. ‘असोचेम’ने नुकत्याच जारी केलेल्या ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर अँड इट्स इम्पॅक्ट ऑन कॉर्पोरेट सेक्टर’ अहवालात असे म्हटले आहे की, जर तुम्ही जागरूक होऊन रोगराई रोखण्यासाठी एक रुपया खर्च करत असाल तर यामुळे १३३ रुपयांचा अनुपस्थितीचा खर्च आणि ६.६२ रुपयांचा हेल्थकेअर खर्च वाचवला जाऊ शकतो. साधारणपणे कोणत्याही सरकारी कामात टेंडर काढले जाते आणि सर्वात कमी किंमत असलेल्यास टेंडर दिले जाते. अशा व्यवहारात विक्रेता उघडपणे स्वस्त माल वापरतो. आता कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे की, ऑफिसात आरोग्य खराब करणारे अन्न दिले जाते. यामुळे कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे अाजार होत आहेत. त्यामुळे अलीकडच्या बैठकांमध्ये हे मी पाहतोय की, चहासोबत स्नॅक्स देत नाहीत, साखर वेगळी देतात. खाण्याबाबत बरीच सावधानता बाळगूनही बाहेरच्या खाण्यामुळे पोट बिघडण्याच्या तक्रारी आहेत. याला कारण मेनू कार्ड आहे. लक्षात घ्या, एखाद्या टॉयलेट सीटवरच्या कव्हरपेक्षाही हजारपट अस्वच्छता मेनू कार्डवर असते. अमेरिका व स्पेनच्या अनेक रेस्टॉरंटमध्ये केलेल्या एका अभ्यासातून असे निष्पन्न झाले आहे की, प्रत्येक मेनू कार्डवर सरासरी १ लाख ८५ हजारांपेक्षा जास्त बॅक्टेरिया आढळून येतात. सात ते ९० दिवसांपेक्षा जास्त काळ हे बॅक्टेरिया या कार्डावर जिवंत असतात. कारण एकाच दिवसात हे मेनू कार्ड अनेक हातातून गेलेले असते. त्यामुळे तज्ञांचा सल्ला आहे की, जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर हात चांगल्या प्रकारे धुवा. कारण एकदम साफ दिसणारे आणि चांगल्या प्रकारे लॅमिनेट केलेले मेनू कार्ड हे डोळ्यांना न दिसणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी मदतच करत असते. फंडा असा : आम्ही अशा काळात आहोत, जेथे बाहेर खाण्यावरच बऱ्याच वेळा अवलंबून राहावे लागते. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता आणि कॅलरीचे प्रमाण सांभाळणे चांगले.

बातम्या आणखी आहेत...