आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात सर्वात भयंकर आहे अंदमानचे सेंटिनल बेट, \'या\' कारणामुळे येथून जिवंत परतला नाही कोणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंदमान-निकोबार- तुम्ही कधी अंदमान-निकोबार बेटांवर फिरायला गेला आहात का? तुमचे उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही या बेटांपैकी सर्वात सुंदर बेटाला पाहिले नसेल. भारत पाहण्यासाठी आलेला एक अमेरिकी पर्यटक हा बेट पाहण्यासाठी गेला असता तेथील लोकांनी त्याची हत्या केली.  सेंटिनेल प्रजातीच्या लोकांनी (सेंटिनलीज) त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या धोकादायक बेटाचे नाव 'सेंटिनेल बेट' असे आहे. जॉन ऐलन चाऊ असे मृत पर्यटकाचे नाव असून त्याच्या मृत्यूच्या संशयावरून पोलिसांनी 7 मच्छिमारांना अटक केली आहे.

 

सेंटिनल बेटावर जाण्यास का आहे बंदी?

सेंटिनेल बेट एक असे द्वीप आहे जिथे जाण्यास बंदी आहे. तिथे सरकारी अधिकारी, व्यावसायिक, आर्मी किंवा पोलिस कोणीही जाऊ शकत नाही. कारण या बेटावर जाणाऱ्यांपैकी कोणीही आजपर्यंत जिवंत परत आले नाही.

 

आकाशातून पाहिल्यानंतर हे बेट एखाद्या सामान्य बेटासारखे शांत, हिरव्या सौंदर्याने नटलेला चहुबाजूंनी पाण्याने वेढलेले दिसते. तरीही एकही पर्यटक किंवा मच्छिमार तिथे जाण्याची हिंमत करत नाही. बाहेरचे लोक या बेटावर जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक हिंसक होऊन प्राणघातक हल्ला करतात.

 

2006 मध्ये काही मच्छिमार चुकून या बेटावर पोहोचले होते. बेटावर गेल्यावर काही काळातच त्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या प्रजातीचे लोक अग्निबाण मारण्यात तरबेज असल्यामुळे बेटाच्या परिसरातून उडणाऱ्या विमानांवरही त्यांनी आगीचे बाण मारून हल्ला केला होता.

 

किती जुने आहे बेट?

बंगालच्या उपसागरात असलेले हे बेट भारताच्या सीमारेषेतील आहे. परंतु अनेक वर्षांपासून या बेटाविषयी असलेल्या रहस्याचे कोडे उलगडले नाही. असे मानतात की, या बेटावर राहणारी प्रजाती 60,000 वर्षे जुनी आहे. सध्याच्या काळात या प्रजातीची लोकसंख्या किती असू शकते यावरही प्रश्नचिन्ह आहे. एका अनुमानानुसार या दुर्मिळ प्रजातीची लोकसंख्या 100 ते 200 एवढी असू शकते.

 

कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप या लोकांना सहन होत नाही. त्यामुळे यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

 

2004 मध्ये एका भयंकर त्सुनामीनंतर अंदमान द्वीप नष्ट झाले होते. या बेटांमध्ये सेंटीनलीज बेटही नष्ट झाले होते, परंतु त्याचा या लोकांवर काय परिणाम झाला, याबद्दल कोणताही माहिती समोर आली नाही. त्सुनामीनंतर भारतीय तटरक्षक दलाने तिथे जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या लोकांनी जवानांच्या हेलिकॉप्टरवर आगीच्या बाणांनी हल्ला चढवला. त्यानंतर तेथे जाण्याचा प्रयत्न थांबवण्यात आला.

 

उत्तर सेंटिनेल बेटाचा इतिहास

या प्रजातीच्या लोकांना पाषाण युगातील लोक असेही संबोधले जाते. तेव्हापासून ते 21व्या शतकापर्यंत त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. सेंटिनलीज जगातील सर्वात भयंकर आणि बाह्य जगापासून वेगळे राहणारे लोक आहे. सेंटिनलीज संपूर्ण जगातील ही एकमेव अशी प्रजाती आहे जिथे सरकारसुद्धा ढवळाढवळ करत नाही.

 

भारत सरकारचे प्रयत्न

> भारत सरकारने अनेक वेळा सेंटिनलीज प्रजातीच्या लोकांच्या हितासाठी काम केले आहे. 
> आदिवासी लोकजमातींसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वायव्हल इंटरनॅशनल संस्थेने सांगितले आहे की, उत्तर सेंटिनेल बेटावर राहणारी सेंटिनलीज लोकांची प्रजाती या ग्रहावरील सर्वात कमजोर लोकांची जमाती आहे. त्यांच्या शरीरात रोगप्रतिकारत क्षमता नसल्यासारखीच आहे. त्यामुळे किरकोळ आजारामुळेही तिथिल लोकांचा मृत्यू होतो. 
> पुर्णपणे वेगळे राहत असल्यामुळे त्यांचा बाह्यजगाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे या लोकांचा महामारीने मृत्यू होण्याचा धोका आहे.
> अंदमान आणि निकोबार प्रशासनाने 2005 मध्ये सांगितले होते की, कोणीही सेंटिनलीज लोकांची जीवनशैली किंवा त्यांच्या परिसरात हस्तक्षेप करु नये यासाठी काही नियम बनवण्यात आले आहे. 

 

> 1981 मध्ये एक जहाज तिथे पोहचले होते. त्या जहाजात असलेल्या लोकांनी सांगितले की, सेंटिनलीज लोक समुद्र किनाऱ्यावर बाण आणि भाले घेऊन उभे होते. परंतु सुरक्षितपणे तिथुन पळुन जाण्यात आम्ही यशस्वी झालो होतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, काही Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...