आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पण एखाद्याचे आयुष्य बदलू शकता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने १ डिसेंबर २०१९ पासून सर्वच टोलनाके हे इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वच वाहनांच्या विंडस्क्रीनवर आरएफआयडीचा टॅग लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या गाडीवर फास्टॅग लावला नसेल तर १ डिसेंबर नंतर तुम्हाला टोलनाक्यांच्या रांगेत थांबावे लागेल. जर हा नियम आयुष्याला लावला तर अशी फास्टॅगशी जोडलेली पहिली गोष्ट लक्षात येते की, १९५७ मध्ये व्ही. शांताराम यांचा चित्रपट 'दो आंखे बारह हाथ' या चित्रपटात तुरुगांचे वॉर्डन म्हणजेच शांताराम हे पॅरोलवर सुटलेल्या ६ कैद्यांना घेऊन चांगला माणूस बनवण्याची जबाबदारी घेतात. ते खून, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यांत दोषी असणाऱ्या कैद्यांना एका खडकाळ, नापिक जमिनीच्या तुकड्यावर शेती करायला लावतात आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याच चढ-उतारानंतर त्या जमिनीवर पीक उगवते. या चित्रपटात अनेक दृश्यांतून सशक्त नैतिकतेचे दर्शन घडविण्यात आले आहे ज्याचा संबध हा कष्ट, एकाग्रता आणि समर्पनाच्या भावनेतून कोणताही व्यक्ती काहीही करू शकते, सोबतच या चित्रपटातून जर लोक आपल्या ऊर्जेचा उपयोग योग्य ठिकाणी करतील तर त्यांना यश मिळेलच ही शिकवण मिळते. आता फास्टॅग हे सरळ २०१९ मध्ये पोहोचले आहेत. आदिनाथसारखं वानवडी पोलिस स्टेशनचे सिनियर अधिकारी क्रांती कुमार पाटील हे किशोर वयाच्या गुन्हेगारीत सहभागी असलेल्या मुलांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अभ्यास करण्याच्या, खेळण्याच्या वयात गुन्हेगारी क्षेत्रात अडकलेल्या मुलांचं आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न ते करत आहेत. असे हे अधिकारी पोलिस प्रशासन यंत्रणेत मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. या गुन्हेगारीत आलेली मुलं ही सार्वजनिक वाहनांची तोडफोड, मोबाइल चोरी अशा प्रकारचे गुन्हे करतात. पण मोठ्या गुन्हेगांरासोबत सहभागी होऊन गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यातही या मुलांचा कल असतो. अशा परिस्थितीत फक्त समुपदेशन करून त्यांचे मन परिवर्तन करणे शक्य नसते. तसेच एकदा पोलिसांनी त्यांना पकडलं तर समाज त्यांच्यावर बहिष्कार टाकतो, शाळेतून त्यांना काढलं जातं, त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत वेगळ वर्तन करू लागतात. या पैलूंवर लक्ष दिलं तर पाटील आणि त्यांचे सहकारी हे एक विशेष सत्राचे आयोजन करतात. या सत्रांमध्ये त्या मुलांच्या मित्रांची आणि कुटुंबीयांची देखील मदत घेतली जाते. चार पोलिस अधिकारी आणि कॉन्स्टेबल यांची टीम मुलांच्या सतत संपर्कात असते. अनेक कोर्सेसच्या माध्यमातून त्यांच्यात कौशल्य गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच कपड्यांची विक्री करणे, भाज्यांची विक्री करणे अशा पद्धतीच्या कामात त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हा उपक्रम सुरू केल्यानंतर काही दिवसांतच याचे परिणाम दिसू लागले आहेत. तीन महिन्यांतच काही मुलांच्या वागणुकीत सकारात्मक बदल झाले आहेत आणि २८ मुलं ही चांगल्या प्रकारचे आयुष्य जगत फास्टॅगच्या रांगेत चालू लागले आहेत. फंडा असा  आपल्या आजूबाजूच्या काही लोकांचे आयुष्य हे फास्टॅगच्या रांगेत गेल्याचे पाहिल्यानंतर लक्षात येईल की भविष्यात आपण चांगल्या समाजाची निर्मिती करत आहोत. मॅनेजमेंट फंडा एन. रघुरामन यांच्या आवाजात मोबाइलवर हिंदीत ऐकण्यासाठी टाइप करा FUNDA आणि SMS पाठवा 9200001164 वर मॅनेजमेंट फंडा, एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in