आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- आज भारताचा माजी क्रिकेटर आणि 'द वॉल' नावाने लोकप्रिय असलेल्या राहुल द्रविडचा 47 वा वाढदिवस आहे. या खास दिनी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने द्रविडला आगळ्या-वेगळया शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने ट्वीट केले की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा जॅमी. तुझी बॅटींग म्हणजे गोलंदाजांसाठी डोकेदुखी होती. वाढदिवस चांगला जावो मित्रा..."
द्रविड आपल्या टिकून खेळण्याच्या शैलिमुळे वॉल नावाने फेमस होता. द्रविडने भारतासाठी 164 कसोटी, 334 वनडे आणि एक टी-20 सामना खेळला आहे. द्रविडच्या नावे सर्वात जास्त बॉल खेळण्याचा रेकॉर्ड आहे. आपल्या 16 वर्षांच्या करिअरमध्ये द्रविडने 31,258 बॉल खेळली. द्रविडने कसोटी सामन्यात सचिनच्या तुलनेत 3 हजार बॉल जास्त खेळले आहेत. तेंडुलकरच आणि द्रविडने मिळून 9,920 रन आणि 20 शतकांची भागीदारी केली आहे. द्रविडने कसोटी 164 सामन्यात 36 शतकांच्या मदतीने 13,288 तर 334 वनडे सामन्यात 12 शतकांच्या मदतीने 10,889 रन काढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.